चूरशीच्या लढती कौन होणार सालेकसा नगरपंचायतचा नगराध्यक्ष

🔽भाजप कांग्रेस मधेच होणार मुख्य लढत
🔽राष्ट्रवादी शप, राष्ट्रवादी अप, शिवसेना शिंदे, शिवसेना उद्धव, गटात तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी भिंडत
सालेकसा-:
सालेकसा नगरपंचायतच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असून, चुरशीच्या लढतील कौन होणार नगराध्यक्ष यावर चर्चाची रंगत वाढली आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, आणि कांग्रेस मधे खरी लढत रंगणार असली तरी निवडणुकीच्या मैदानात असलेले शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव गट, राष्ट्रवादी अजितपवार गट, राष्ट्रवादी शरदपवार गट, वंचित बहुजन आघाडी यामध्ये तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर कौन राहणार यासाठी सुद्धा लढत रंगणार असल्याचे चित्र आहे.
निवडणुकीत उतरलेल्या सर्वच पक्षानी जोरात प्रचार प्रसार केला घरोघरी जाऊन प्रत्येक्ष मतदारांची भेट घेऊन पूर्ण क्षेत्र पिंजून काढला आहे. नगरसेवकपदासाठीच्या 17 जागांसाठी 63 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये भाजप आणि कांग्रेसचे 17 जागासाठी सतरा-सतरा उमेदवार उभे आहेत. मात्र शेष पक्ष नगरसेवकपदासाठीच्या 17 जागासाठी पूर्ण उमेदवार उभे करू शकले नाहीत. पण नगराध्यक्ष पदासाठीच्या एका जागेसाठी एकूण 7 पक्षांनी आपले उमेदवार उभे करून पूर्ण ताकदीने भाग घेतल्यामुळे एकमेकांना मदत होण्याची शक्यता कमी आहे. भाजपचा दावा आहे की, केंद्रात व “राज्यात खऱ्या अर्थाने आमची सत्ता आहे. पाणी आणि सांडपाणी योजना आम्हीच आणली आहेत, ”क्रीडा संकुल, अंतर्गत रस्ते, पूल, आमगांव दर्रेकसा मुख्य रस्ता बांधकामास मंजुरी, एसटी बस स्टॅन्ड इमारत बांधकामास मंजुरी, न्यायालयाची इमारत बांधकामास मंजुरी, आणि पोलिस ठाण्याची इमारत बांधकाम यांसारखी विविध विकासात्मक कामे केली आहेत आणि यापुढेही नगरपंचायत क्षेत्रात विकासाची कामे आम्हीच करू शकतो. त्यामुळे मतदारांची पसंती भाजप आहे विकासाच्या मुद्यावर नगराध्यक्षसह सर्वाधिक नगर सेवक आमचे निवडून येतील असा दावा भाजप करीत आहे. कांग्रेस उमेदवारांचा दावा आहे की, योजनेत अनेक त्रुटी असून त्या पूर्णत्वाकडे गेल्या नाहीत. तसेच शहराच्या अनेक मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी व गावाच्या योग्य विकासासाठी नगरपंचायत क्षेत्रातील मतदार कांग्रेसला निवडतील असा दावा करीत आहेत. सालेकसा तालुक्यातील सर्व चारही जिल्हा परिषद प्रभाग क्षेत्रात कांग्रेस पक्षांचे जि.प. सदस्य आहेत, पंचायत समिती कांग्रेसच्या ताब्यात आहे. तर आमदार भाजपचे असून ते तळ ठोकून सालेकसात बसले असल्यामुळे भाजप व कांग्रेसच्या मधात निवडणूक चूरशीची झाली आहे. सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी प्रचाराच्या मुद्द्यात शहराच्या विकासाचे प्रश्न, रखडलेले मुद्दे, तसेच उमेदवार व पक्षांचे जाहीरनामे व वचननामे प्रचारात प्रमुख ठरण्याची शक्यता आहे. यासह प्रतिस्पर्ध्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्याही फेऱ्या झाल्या आहेत. आता उमेदवारांनी मतदारांशी प्रत्येक्ष गाठीभेटींवर भर दिला आहे. रॅली आणि प्रभागातून प्रचारफेरी काढली जात आहेत. उमेदवारांनी प्रचारपत्रके, चित्रफिती, गल्लोगल्ली फिरणाऱ्या रिक्षा यांसह शहरात रणधुमाळी रंगवली आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांकडून मतदारांना जागरूक राहून केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मतदान करण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: चूरशीच्या लढती कौन होणार सालेकसा नगरपंचायतचा नगराध्यक्ष, ID: 30781

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर