शिका मोठे व्हा, पण आई वडिलांचे श्रम संस्कार विसरू नका- रमेश चुटे

🔽साखरीटोला महाविद्यालयांच्या श्रम संस्कार शिबिरामध्ये रमेश चुटे यांचे प्रतिपादन
साखरीटोला/सालेकसा-:
जीवन शैली वेगाने बदलत असली तरी महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रम संस्कार शिबिर हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यासाठी विचारांची अनमोल शिदोरी आहे. ती प्रत्येकाने जपून ठेवावे. विध्यार्थ्यानी खूप शिकावे मोठे व्हावे, पण आई वडिलांचे श्रम संस्कार विसरू नये असे प्रतिपादन सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी केले. 18 डिसेंबर रोजी पानगाव/रामपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरशी संलग्न अष्टविनायक बहू. शिक्षण संस्था आमगाव व्दारा संचालित साखरीटोला महाविद्यालय साखरीटोलाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रम संस्कार शिबिराच्या 7 दिवसीय कार्यक्रमात कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून साखरीटोला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य संतोष मस्के हे होते. तर दीपप्रज्वलन सरपंच मंगलाताई कोरे यांचे हस्ते पार पडले. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. शाळेचे मुख्याध्यापक नितीन राहाँगडाले, शाळा व्यवस्थापन समितीचे प्रेमलाल राहाँगडाले,तमूस समितीचे मोहनसिंग बघेल, शिक्षिका सौ. एस. डी. दहिकर, ग्रामपंचायत अधिकारी व्ही. जी. भुते, मुख्याध्यापिका मीनाक्षी चुटे, संदीप कटरे, ग्रा.प. सदस्य रेखाबाई तरोने, कविताबाई ब्राम्हणकर, गुणवन्ता लोणारे, माधुरी धुर्वे, लक्ष्मीबाई दोनोंडे, मीनाबाई राने, गीताबाई बहेकार उपस्थित होते. याप्रसंगी विध्यार्थिनींनी नृत्याचे माध्यमातून सुंदर असे स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गुर्वे यांनी मांडले. सूत्रसंचालन प्रा. पिंकी हेमने यांनी केले. तर उपस्थितांचे आभार प्रा.सुनीता बोपचे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साखरीटोला महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य प्रीती देशमुख,रासेयो नागपूरचे संचालक डाँ. सोपानदेव पिसे, रासेयो जिल्हा समन्व्यक नमाद महा. गोंदियाचे डाँ. बबन मेश्राम, कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मस्के, प्रा. राहुल फुंडे, प्रा. पिंकी हेमने, विध्यार्थी प्रतिनिधी सचिन ब्राम्हणकर, प्राची कोटागंले यांनी परिश्रम घेतले. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिका मोठे व्हा, पण आई वडिलांचे श्रम संस्कार विसरू नका- रमेश चुटे, ID: 30815

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर