आजपासून साखरीटोला येथे भागवत कथा ज्ञान यज्ञ

🔽सात दिवस राधे-राधे
साखरीटोला/सालेकसा -:
सालेकसा तालुक्यातील साखरीटोला/सातगाव येथे आज 31 डिसेंबर पासून अध्यात्मिक प्रवचनकार, कथा व्यास दीदी राधा किशोरीजी वृंदावन धाम यांच्या मधुर वाणीतुन सार्व. हनुमान मंदिर प्रांगणात भागवत कथा ज्ञान यज्ञ होणार आहे. तो 6 जानेवारी 2026 पर्यत सात दिवस चालणार आहे. यादरम्यान 31 डिसेंबर रोजी भव्य मंगल कलश यात्रा काढून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे, भागवत ज्ञान कथेचे वेळ साय. 4 वाजता पासून ते रात्री 7 वाजता पर्यंत राहणार आहे. भागवत कथा ज्ञान यज्ञ कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आव्हान सुनील अग्रवाल, प्रभाकर दोनोंडे, रमेश चुटे, ललित अग्रवाल, राजू अग्रवाल, प्रदीप अग्रवाल, अरविंद असाटी, पुर्थ्वीराज शिवणकर, संतोष अग्रवाल, मोहन दोनोंडे, बब्बू ठाकूर, शामलाल दोनोंडे, संजय देशमुख, अजय उमाटे, नरेश कावरे, संतोष बोहरे, गोपीचंद पंजवानी, देवराम चुटे, राजू डोंगरे, तेजुलाल अग्रवाल, राजू काळे, रतीराम कोरे, दयाल कावरे, बिट्टू अग्रवाल, संजय मिश्रा, मुकेश छाबडा, मुन्ना लांजेवार, किशोर कश्यप, तसेंच साखरीटोला येथील समस्त व्यवसायिक व गावकऱ्यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: आजपासून साखरीटोला येथे भागवत कथा ज्ञान यज्ञ, ID: 30828

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर