आमगांव- : गोंदिया जिल्ह्यातील आमगांव तालुक्यातील जवरी येथील शेतकरी शंकर सिताराम डोये वय 64 वर्ष यांनी शेतीच्या कर्जावरून गावांतील अवैध सावकार कैलाश माधोराव हत्तीमारे जवरी यांच्या कडुन झालेल्या कर्जापोटी व्याजाने 140000 (एक लाख चाळीस हजार रुपये) व्याजाने मागितले सावकाराने बदल्यात एक एकर 0.40 हे.आर. जमीन गहाण (तारण) करावे लागेल तर मी ‘ तुम्हाला रुपये देतो म्हटल्यावर कर्जात बुडालेला शेतकरी 2 टक्के व्याज दराने तयार झाला. त्याच्यांत फक्त 4 महिन्या करिता करार झाला. 4 माहिन्यानंतर मुद्दल व व्याज परत करणार या तोंडी करारानुसार शंकर डोये ला सावकार कैलाश हत्तिमारे यांनी 50 हजार रुपये चा स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा आमगांव चा अकाउंट पे चा चेक दि. 11/08/2025 ला दिला व उर्वरित 90 हजार रुपये दुसऱ्या कडून मागुन देतो म्हणुन गोंदिया येथील परवाना धारक सावकार झुलनबाई हेमराज पटले यांनी कैलाश हत्तिमारे च्या म्हणण्यावरून एचडीएफसी बँक शाखा आमगांव च्या नावे अकाउंट पे चा 90 हजार रुपये चा चेक दिला. असे एकुण 140 हजार रुपयाचे चेक दिले दि.11/08/2025 ला दिले त्या व्यतिरिक्त नगदी रुपये दिले नाही. व त्याच दिवशी आमगांव येथे रजिष्ट्री केल्यावर गावच्या लोकांना माहिती होईल आपला व्यवहार हा आपसांत आहे व व्याजाचा धंदा हा चोरीचा आहे करिता आमगांव तालुका सोडून गोरेगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेऊन 0.40 हे.आर. म्हणजे एक एकर जमीनी ची रजिष्ट्री केली. व त्यांत 1,40,000 चे दोन चेक व नगदी 3,40,000 असे एकुण 4,80,000 रुपये दिल्याचे रजिष्ट्री मध्ये लिहीले. त्या दिवशी चेक बँकेत जमा केले नव्हते. त्यावर शेतकरी शंकर डोये व त्यांचा मुलगा सतीश यांनी रजिष्ट्री करायला नकार दिला तेव्हा कैलाश हत्तिमारे यांनी तारण करतांना असेच लिहावे लागते असे विश्वास पुर्ण सांगितले. व ठरल्या प्रमाणे 4 महिन्यांनी आमचे एक लाख चाळीस हजार रुपये 2% व्याजासह परत करावे. व रजिष्ट्री मध्ये लिहिलेले 3,40,000(तिन लाख चाळीस हजार रुपये) फक्त रजिष्ट्री मध्ये बाजार भावानुसार लिहावे लागतात त्या करिता लिहीले जें आम्ही तुम्हाला दिले नाही. हा व्यवहार ईमानदारीने राहणार. करिता हिशोब करतांना मी तुमच्या कडुन फक्त एक लाख चाळीस हजार अधिक 2% व्याज घेणार व त्यानंतर आम्ही दोघेही तुम्हाला तुमच्या नावांने पुन्हा रजिष्ट्री करून देणार हे आश्वासन दिल्यावर शंकर डोये यांनी 1) अशोककुमार हेमराज पटले रा. मानेगांव परवाना धारक सावकार झुलनबाई चा मुलगा व
2) कैलाश माधोराव हत्तिमारे रा. जवरी अवैध सावकार या दोन नावाने दि. 11/08/2025 ला बैंकेत चेक लावण्यापूर्वीच रजिष्ट्री करून दिली. तेव्हा कैलाश हत्तिमारे यांनी फेरफार करणार नसल्याचे वचन दिले व दोन महिने फेरफार केले नाही. परंतू दोन महिन्या नंतर शंकर डोये यांना माहिती न करता गपचुपपणे दि.25/10/2025 ला तलाठी कार्यालय जवरी येथे आपल्या नावांने फेरफार केले. ही माहिती ई पिक करण्यासाठी जमीनीचा 7/12 काढले असता शेतकरी शंकर डोये यांना कळले त्यामुळे शंकर डोये व त्यांचा मुलगा राजेश व सुन ज्योती हे कैलाश हत्तिमारे यांच्या घरी गेले व तुम्ही आपले रुपये व्याजासह परत घ्या व माझी जमीन रजिष्ट्री करून द्या म्हटल्यावर कैलाश हत्तिमारे बेईमानीवर येऊन तुझी रजिष्ट्री झाली आता *”तुझ्या सोबत जो बनते तो तु कर जास्त केलास तर तुला व तुझ्या पोराला जीवाने मारून आम्ही पैशा वाले लोक आहोत”
असे बोलून जीवाने मारण्याची धमकी दिली.
अशा प्रकारे गैरअर्जदार कैलाश हत्तिमारे जवरी, झुलनबाई पटले व अशोककुमार पटले मानेगांव या तिघांनी संगनमत करून शेतकरी शंकर डोये यांची फसवणुक केली. सदर शेतकऱ्याला न्याय मिळाला नाहीतर शेतकरी आपल्या कुटुंबासाठी आपली किडनी देवून कर्ज फेडण्यासाठी जिवाचा बरं वाईट करायला तयार असल्याचे सांगितले.
अशावेळी शेतकऱ्याच्या जिवाला काही झाला तर त्याला गैरअर्जदार व पोलीस प्रशासन जबाबदार राहण्याची प्रतिक्रिया स्वतः शंकर डोये यांनी कुटुंबीयासह दिली.
सदर प्रकरणात आमगांव पोलीसांची भूमिका संशयास्पद आहे.




