वर्तमानपत्रे म्हणजे समाजमनाचा आरसा- रमेश चुटे

🔽 सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिवस थाटात
साखरीटोला/सालेकसा-: बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र सुरु केले व त्याचे नाव ही अगदी योग्यच होते. दर्पण म्हणजे आरसा. वर्तमानपत्रे हे समाज जीवनाचा आरसा आहे. समाजात सामाजिक, आर्थिक, शासकीय, राजकिय, शैक्षणिक अशा विविध पातळीवर जे घडते त्याचे पडसाद वृत्तपत्रात उमटतात. त्यामुळे प्रत्येकाने वर्तमानपत्र हे वाचलेच पाहिजे असे प्रतिपादन सालेकसा तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी केले. तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने 6 जानेवारी 2026 मंगळवार रोजी साखरीटोला येथील बॅरिस्टर राजाभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाचे सभागृहात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघांचे सचिव प्रा. सागर काटेखाये होते. दीपप्रज्वलन संघाचे अध्यक्ष रमेश चुटे यांनी केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राकापाचे तालुका डाँ. अजय उमाटे, प्रा. गणेश भदाडे, प्रा. मुकेश बावनथडे, आकाश बिसेन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या चित्रासमक्ष दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोठयागतीने इतरही प्रसार माध्यमे आलीत. मात्र, वृत्तपत्रांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले व शहरच नव्हे तर ग्रामीण भागापर्यंत वृत्तपत्राचे जाळे पसरले आहे. असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सागर काटेखाये यांनी व्यक्त केले. वृत्तपत्रे ही सर्व सामान्यांसाठी महत्वाची भुमिका बजावतात. शासकीय योजना, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, शेतीविषयक, सांस्कृतिक घडामोडी, वर्तमानपत्रातूनच मिळते. असे मत डाँ. अजय उमाटे यांनी व्यक्त केले. वृत्तपत्रात भिन्नभिन्न वाचक गटासाठी खास पुरवण्या असतात. स्त्रीयांसाठी, युवावर्गासाठी, बालकांसाठी, वृध्दांसाठी भरभरुन माहिती दिली जात असल्याने समाज आणि वर्तमानपत्र यांच एक अतुट नातं बनलं आहे असे मत प्रा. गणेश भदाडे यांनी प्रास्ताविकेतून व्यक्त केले. संचालन प्रा. बावनथडे यांनी तर उपस्थित्यांचे आभार कु. राची फुंडे यांनी मानले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: वर्तमानपत्रे म्हणजे समाजमनाचा आरसा- रमेश चुटे, ID: 30843

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर