सालेकसात शिवजयंतीची जय्यत तयारी

🚩शिवप्रेमीच्या उत्साहात उधाण, अवघे शहर भगवेमय
🔷भव्य मशाल रैली व प्रबोधन
🔷राजे शिवाजी व आई जिजाऊसह शोभायात्रेचे आयोजन
साखरीटोला/सालेकसा -:(रमेश चुटे)
स्त्री सन्मान, धार्मिक सहिष्णुता, आणि रयतेचे कल्याण हे मुख्य उद्देश केंद्रस्थानी ठेवून हिंदवी स्वराज्याचा पाया रचणारे समाजाला ताठ मानेने जगायला शिकविणारे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा 396 वा दोन दिवसीय शिवजन्मोत्सव कुणबी समाज सेवा समिती सालेकसाच्या वतीने 18 व 19 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून शिवजयंती महोत्सव समितीचे मावळे कार्यक्रमाला भव्य दिव्य करण्यासाठी तोरण, पत्ताके, बॅनर, शिवध्वज, माशाली तयार करायला लागले आहेत. 18 रोजी रात्री 7 वा. पासून विशाल मशाल रैलीचे आयोजन करण्यात आले असून मशाल रैली व्दारे सालेकसात नगर भ्रमन केले जाणार आहे. 19 रोजी सकाळी 10 वा. विशेष आकर्षण असलेली भव्य मिरवणुक व शोभायात्रेची सुरुवात होणार आहे. घोड्यावर राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आई जिजाऊ यांचे दर्शन घडणार आहेत. यामध्ये शिवज्योत, मावळयांसह वारकरी मंडळी, वारकरी महिला, ढोल पथक, पारंपारिक वेशभुषा यांचा समावेश राहणार आहे. सदर शोभायात्रा दुपारी 1 वाजता कार्यक्रम स्थळी पोहचेल व आमंत्रित अतिथीच्या हस्ते शिवजन्मोत्सव कार्यक्रमाचे विधिवत शुभारंभ होणार आहे. दुपारी 3 वाजताचे सुमारास मान्यवरांच्याहस्ते समाजातील होतकरू युवक, युवती, व विध्यार्थ्यांना शिवछत्रपती गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. तर याच दिवशी सायंकाळी 7 वाजता शिवजन्मोत्सव कार्यक्रम स्थळी तुफान विनोदी कीर्तनकार संघपाल पवनुरकर यांचे प्रबोधन होणार आहे. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समितीचे गौरीशंकर भेंडारकर, रवींद्र चुटे, विजय बहेकार, महेश बागडे, शाम येटरें, निलेश बोहरे, सचिन बहेकार, किशोर चुटे, सुरेश मेंढे, गोपीचंद शिवणकर, ऍड.पारसनाथ थेर, गौरीशँकर मेंढे, प्रकाश चुटे, अभिषेक चुटे, अशोक खोटेले, लखन बहेकार, जितेंद्र शेंडे, जितेंद्र शेंडे, पवन पाथोडे, कृष्णा मेंढे, बाजीराव तरोने, संजय बारसे, यशवंत शेंडे, दिशांत फुंडे, तरुण मेंढे, रोहित शिवणकर, राजेश डोये, आदित्य दोनोंडे, अविनाश बोहरे, राहुल ब्राह्मणकर, अश्विन बारसे, भावेश फुंडे, ओम बहेकार, निलेश बागडे, विशाल बागडे, हिमांशू चुटे, सारांश मेंढे, कुणाल शिवणकर, शौरभ भांडारकर, सागर पाथोडे, मंगेश चुटे सौ. कविता येटरे, लता फुंडे, लक्ष्मी हेमने, विद्या बोहरे, शोभा पाथोडे, वंदना डोये, निशा बागडे, दीप्ती ब्राम्हणकर, सुषमा मेंढे, शशी फुंडे, ममता बहेकार, सुनीता थेर, कविता शेंडे, मंजू मेंढे व उत्सव समितीचे समस्त पदाधिकारी परिश्रम घेत असून शिवजन्मोत्सवात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कुणबी समाज सेवा समितीचे अध्यक्ष गौरीशंकर भेंडारकर, सौ. कविता येटरें दिशांत फुंडे यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सालेकसात शिवजयंतीची जय्यत तयारी, ID: 30871

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर