🔽साखरीटोला येथे विराट हिंदू संमेलन थाटात
🔽मंगल कलश यात्रा व भजन स्पर्धेचे आयोजन
साखरीटोला/सालेकसा -:
हिंदू समाज संघटित झाला तरच देश बलशाही होऊ शकतो. त्यामुळे धर्म रक्षणार्थ राष्ट्रभावना जागृत करण्यासाठी हिंदू संघटीत होणे, ही आज काळाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन कृष्णा ठाकरे यांनी व्यक्त केले ते 21 रोजी साखरीटोला येथील श्री हनुमान मंदिराचे पटांगणात समग्र हिंदू समाज मंडळ साखरीटोला व्दारे आयोजित हिंदू संमेलनात बोलत होते. व्यासपीठावर मुख्यवक्ता म्हणून कृष्णाजी ठाकरे,तर प्रमुख अतिथी म्हणून भरतरामजी चुटे, गोपालकृष्ण बोहरे, पूनाराम कावरे, परसराम मेश्राम, वसंतराव उमाटे, ललितकुमार अग्रवाल, जंगलूजी फाफनवाडे, गौतमबाई, हत्तीमारेबाई पिसेबाई उपस्थित होते. सर्वप्रथम कलश यात्रा काढून जयघोष करत गावात भ्रमन करण्यात, मान्यवरांच्या हस्ते गौमाताचे पूजन व पश्चात भगवान श्रीराम व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन व माल्यार्पण करण्यात आले. फळझाडाचे रोपटे देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्य मार्गदर्शक कृष्णा ठाकरे यांनी हिंदू समाज व राष्ट्र यावर उद्बोधन केले. हिंदू समाजाने आपल्या मूळ राष्ट्रीय धारेला चिटकून राहिले पाहिजे तरच भारताची प्रगती होईल. समाजाची स्थिती बदलण्याचे काम कोणीही एक व्यक्ती करू शकत नाही. त्यासाठी समाजाची स्थिती बदलायची असेल तर ती इच्छा समाजाने निर्माण केली पाहिजे, यासाठी संघाने पंच परिवर्तनाच्या नावाचा विषय सुरू केला आहे. यामध्ये कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, स्व आधारित जीवनशैली नागरि कर्तव्य व सामाजिक समरसता हे समाज परिवर्तन घडवून आणतील, असे मत ठाकरे यांनी व्यक्त केले. देश, धर्म, संस्कृती, परंपरा रक्षणाचे कार्य व जनजागृतीचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करीत आहे. संघाच्या हिंदू जागरण कार्यात समाजाने हातभार लावावा, असे आव्हान करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान हनुमान चालीसा पाठ, व भजन स्पर्धा ठेवण्यात आले होते. यात श्री गणेश भजन मंडळ साखरीटोला, दुर्गामाता भजन मंडळ सातगाव, दुर्गा भजन मंडळ साकऱीटोला, वैष्णव भजन मंडळ कारूटोला, गुरुदेव भजन मंडळ सलगंटोला, दुर्गा भजन मंडळ कारूटोला, आदर्श महिला भजन मंडळ साखरीटोला, बाल कला भजन मंडळ जैतूरटोला यांनी भाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चुटे यांनी मांडले, संचालन अरविंद फुंडे यांनी उपस्थिताचे आभार देवराम चुटे मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी समग्र हिंदू समाज मंडळ साखरीटोलाचे कमलेश अग्रवाल,आशीष दाते, पंकज दोनोंडे, महेंद्रसिंग बैस, अंकित मिश्रा रामदास हत्तीमारे, बब्बू ठाकूर, विशाल चकोले, मनोज अग्रवाल, संतोष बोहरे, सुनील पंजवानी, अरविंद फुंडे, नितीन शिवणकर, बब्लू कटकवार प्रेम दोनोंडे, देवराम चुटे, संदीप अग्रवाल, संतोष अग्रवाल, पुर्थ्वीराज शिवणकर, प्रदीप अग्रवाल, रमेश चुटे, सुनील अग्रवाल यांनी परिश्रम घेतले.





