Published:

विद्या निकेतन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनीचे उत्तुंग यश;

रंगोत्सव’ स्पर्धेत कादंबरी चुटे हिचा गौरव
आमगाव:-
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्या निकेतन कॉन्व्हेंट, आमगाव येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात शाळेतील इयत्ता दुसरीची विद्यार्थिनी कादंबरी ऋषीकुमार चुटे हिचा गौरव करण्यात आले. ‘रंगोत्सव सेलिब्रेशन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कला संस्थेमार्फत आयोजित ‘कलरिंग’ (रंगभरण) स्पर्धेत कादंबरीने उत्कृष्ट कामगिरी करत विशेष प्राविण्य मिळवले आहे. शाळेत 10 मार्च रोजी आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात कादंबरीला तिचे सन्मानपत्र, ट्रॉफी आणि शैक्षणिक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत तिने दाखवलेल्या कलात्मक कौशल्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ‘रंगोत्सव’ सारख्या प्रतिष्ठित व्यासपीठावर आपल्या कलेचा ठसा उमटवल्याबद्दल शाळेच्या वतीने तिचा विशेष सत्कार करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक बी. वाय. ताजने, कांग्रेसच्या तालुका अध्यक्ष सौ.कविता रहांगडाले, सौ. सत्यकला छिपे, सौ. मीरा पांडे, पोलीस प्रशासनातील सौ.सरिता शेजमारे, अतरी शेख, शिक्षिका सौ. सोमवंशी, पुंडकर, शहारे, लक्षने, गायधने, कुर्वे, मोटधरे, वर्गटंवार, कटरे, चुटे, श्रीखंडे, फुंडे, स्वाती बैस, पूनम बैस, टेभंरे, बोहरे, दीपिका रहांगडाले, पूजा रहांगडाले, पटले, उपस्थित होत्या. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत उपस्थित महिलांनी कादंबरीच्या यशाचा गौरव केला आणि तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.​कादंबरीच्या या यशामुळे तिचे कुटुंब आणि परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. लहान वयातच कलेची जोपासना करून मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: विद्या निकेतन कॉन्व्हेंटच्या विद्यार्थिनीचे उत्तुंग यश;, ID: 30893

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर