🔽चुटे कुटूंबियांचे कुलदैवत कट्टीपारला येणार
साखरीटोला-: (रमेश चुटे) जवळच असलेल्या कट्टीपार येथे आज ३ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी श्री शितरू पाटील बाबांच्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य ज्योत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ‘चुटे’ परिवार आणि ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच दिवशी ग्राम ‘मासळ’ येथून चुटे परिवाराचे कुलदैवत दर्शनासाठी कट्टीपार येथे आणले जाणार आहे. भाविकांना ३ आणि ४ एप्रिल या दोन दिवसांत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. शनिवार, ४ एप्रिल रोजी ज्योत विसर्जन, दहीकाला आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला समस्त चुटे परिवार आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चुटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: Elgar Live News
Post Views: 36




