देवरीः- (दि.12) गोंदिया जिल्हायात विद्यार्थ्याना महापुरुषाची आठवण करुन देण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती ही दरवर्षी प्रमाणे ह्य वर्षी ही सामान्य ज्ञान परिक्षा घेण्यात आली.सामान्य ज्ञान परिक्षा ही भारताच्या संविधानातील कलमावर आधारित,महापुरुषांचा आंदोलन ,गणित व चालु घडामोडी वर आधारित होती.गोंदिया जिल्ह्यात २००० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.त्यामध्ये देवरी तालुक्यात ५ ते ८ मध्ये ५५ उच्च माध्यमिक गट १५, ओपन गट वर्ग १२ वी च्या वर १२ विद्यार्थी होते. विद्यार्थ्याना परिक्षा मध्ये पारितोषिक पण ठेवण्यात आले होते.उच्च माध्यमिक गट ५ ते ८ प्रथम पुरस्कार ८००० रु व्दितीय पुरस्कार ५०००,तृतीय पुरस्कार ३००० रुपये,उच्च माध्यमिक गट प्रथम पुरस्कार ८००० रु व्दितीयपुरस्कार ५०००,तृतीय पुरस्कार ३००० रुपये,ओपन गट वर्ग १२ वी च्या वर प्रथम पुरस्कार ८००० रु व्दितीय पुरस्कार ५०००,तृतीय पुरस्कार ३००० रुपये असे पुरस्कार ठेवण्यात आले आहेत. प्रोत्साहन पुरस्कार वितरण दि.२८ एप्रिल २०२६ ला होणार आहे.




