आदीवासी समाजाला गुमराह करण्याचे काम स्थानिक आमदार आपल्या फायद्यासाठी करतात. पुराडाः- ( दि.26) आदीवासी समाजातील युवकांचे सामुहिक लग्न लावण्याचे काम मागील वर्षापासुन आमदार यांच्या प्रयत्नाने होत आहे.आमदार हे आदीवासी समाजाचे आहेत.त्याची पत्नी ही ओबीसी समाजाची आहे.आदीवासी समाजाची परंपरा ही हिंदु विवाह सोहळ्यापेक्षा वेगळी आहे.आदीवासी समाज ही लग्न पारंपारिक पध्दतीने होत असतांनी त्यांची संस्कृती ही मंडपाच्या दिवशी मोहफुलाचे झाड आणुन त्या झाडाला कोरीव काम करतात त्यांच्या भोवती रात्रभर संस्कृतीनुसार नाचतात लग्नाच्या दिवशी वर धोती व वधु लुंगडा घालुन विवाह सोहळा पार पाडतात. आदीवासी समाजामध्ये हवन पुजन होत नाही.आदीवासी समाजामध्ये सत्यानारायण कथा होत नाही.आदीवासी समाज हा आपल्या समाजामधीलच व्यक्तीच्या मार्फत त्यांचे लग्न लावण्याचे काम होतो. पुराडा येथिल सामुहिक सोहळा हा पंरपरेच्या विरोधात असतांनी आमदार यांनी आपल्या बिजेपी च्या नेत्यांना खुश करण्यासाठी हा विवाह सोहळा साजरा केला का?अशी चर्चा आदीवासी समाजातील सामाजिक कार्यकर्त्याची आहे.सामाजिक कार्यकर्त्याची ठाम भुमिका अशी आहे की हा विवाह सोहळा आदीवासी पंरपरेला घातक आहे.




