देवरी प्रकल्पात राबविण्यात येत असलेल्या विविध योजना व उपक्रमाचे केलै कौतुक………….
दिनांक १४ मे,२०२६ रोजी मा.श्री. विजय वाघमारे (भा.प्र.से) सचिव, आदिवासी विकास विभाग, यांनी गोंदिया ता.देवरी प्रकल्प कार्यक्षेत्रामधील धमदीटोला येथे शबरी महामंडळ अंतर्गत गोंडाऊन बांधकाम ची पाहाणी करण्यात आले तसेच (FRMC) समिती सदस्या सोबत अडीअडचणीसंदर्भात चर्चा करण्यात आली,गणुटोला/कडीकसा येथील तेंदुपत्ता संकलन प्रक्रिया केंद्रास भेट, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत चिचगड येथील आदिवासी सांस्कृतीमधील महत्वपुर्ण असे गोटूळ नुतनीकरणास भेट देवुन पाहाणी करण्यात आली तसेच, न्युक्लिेस बजेट योजेअंतर्गत महिला बचत गटामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध कामाची पाहाणी तसेच राणी दुर्गावती योजनेअंतर्गत विविध व्यवसाय लाभार्थी महिला सोबत संवाद साधण्यात आला. तसेच नरेगा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या बांबू रोपवन, येथे भेट देवुन पाहणी करण्यात आली.
शासकिय कन्या आश्रमशाळा बोरगाव /बा येथे सुरु असलेल्या उन्हाळी शिबीर सहभागी २२५ विद्यार्थ्यासोबत भेट देवुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, देवरी अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासकीय आश्रम शाळा, बोरगाव बाजार येथे उन्हाळी शिबिर २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला दिनांक १५ मे २०२६ रोजी मा.सचिव, महोदय, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी शिबिरातील विविध प्रशिक्षण वर्गांची पाहणी करून विद्यार्थ्यांशी अतिशय मनमोकळा संवाद साधला.
मा. सचिव महोदयांनी शिबिरातील सांस्कृतिक विभागाला भेट दिली. या विभागात विद्यार्थ्यांना नृत्य, संगीत आणि ड्रामा (नाट्य) यांचे विशेष प्रशिक्षण दिले जात असल्याचे पाहणीदरम्यान महोदयांनी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले नृत्याचे व संगीताचे सादरीकरण पाहिले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेली नैसर्गिक लय आणि कलेप्रती असलेली त्यांची आवड पाहून त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच, ड्रामा वर्गातील विद्यार्थ्यांच्या अभिनय क्षमतेचे आणि त्यांच्यातील आत्मविश्वासाचे त्यांनी आवर्जून कौतुक केले व कलेच्या माध्यमातून स्वतःचा विकास कसा साधावा, याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर महोदयांनी चित्रकला आणि हस्तकला वर्गांची सविस्तर पाहणी केली. विद्यार्थ्यांनी रेखाटलेली हुबेहूब पोट्रेट्स, आकर्षक रांगोळ्या, पेंटिंग आणि मेहंदीच्या डिझाईन्स पाहून त्यांनी विद्यार्थ्यांच्या सूक्ष्म कलाकुसरीची स्तुती केली. या विभागात बांबू प्रशिक्षण वर्गाला त्यांनी विशेष वेळ दिला. बांबूपासून बनवलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू, गृहसजावटीचे साहित्य आणि दैनंदिन वापरातील वस्तूंचे निरीक्षण करून महोदयांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या पारंपारिक कौशल्याला आधुनिकतेची जोड देऊन भविष्यात आर्थिक स्वावलंबनासाठी याचा कसा उपयोग होऊ शकतो, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीच्या उद्देशाने आयोजित अथलेटिक्स आणि मल्लखांब वर्गालाही महोदयांनी भेट दिली. आदिवासी विद्यार्थ्यांचा नैसर्गिक स्टॅमिना आणि चपळता अथलेटिक्सच्या प्रात्यक्षिकांमधून दिसून आली. तसेच, मल्लखांब या पारंपरिक आणि शारीरिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक खेळातील विद्यार्थ्यांची कसरत आणि शरीराचा तोल सांभाळण्याचे त्यांचे कसब पाहून महोदयांनी आश्चर्य आणि समाधान व्यक्त केले. या विद्यार्थ्यांनी भविष्यात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर मल्लखांबमध्ये आपल्या प्रकल्पाचे नाव रोशन करावे, अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त करून खेळाडूंचे मनोधैर्य वाढवले.
आधुनिक तंत्रज्ञान विभाग (एआय आणि रोबोटिक्स) या शिबिराचे सर्वात मोठे व नाविन्यपूर्ण आकर्षण असलेल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि रोबोटिक्स’ प्रशिक्षण वर्गाला महोदयांनी दिलेली भेट अत्यंत लक्षवेधी ठरली. दुर्गम आणि आदिवासी भागातील विद्यार्थी रोबोटिक्सचे कोडिंग करत आहेत आणि एआय प्रणाली समजून घेत आहेत, हे चित्र पाहून मा. सचिव महोदयांनी अत्यंत आनंद व्यक्त केला. त्यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेले छोटे रोबोट्स आणि त्यांचे तंत्रज्ञान आधारित प्रकल्प पाहिले. एकविसाव्या शतकातील या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाशी आदिवासी विद्यार्थी यशस्वीपणे जोडले जात आहेत, हा आदिवासी विकास विभागाच्या वाटचालीतील एक मोठा व अभिमानास्पद टप्पा असल्याचे मत त्यांनी यावेळी नोंदवले.
विद्यार्थ्यांशी साधलेला मुक्त संवाद व मार्गदर्शन प्रत्येक विभागाला भेट दिल्यानंतर मा. सचिव महोदयांनी सर्व विद्यार्थ्यांशी एकत्रित संवाद साधला. हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला. पारंपारिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची सांगड घालूनच भविष्यातील प्रगती शक्य आहे, हा कानमंत्र त्यांनी दिला. उन्हाळी शिबिरात शिकलेल्या या सर्व गोष्टी केवळ छंदापुरत्या मर्यादित न ठेवता, भविष्यातील करिअरची दिशा ठरवण्यासाठी या कौशल्यांचा वापर करावा, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
मा. सचिव महोदयांच्या या सदिच्छा भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे शासकीय आश्रम शाळा, बोरगाव बाजार येथील उन्हाळी शिबिराला एक वेगळीच ऊर्जा प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, देवरी प्रकल्प स्तरावर राबविण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली गेल्याने, सर्व अधिकारी, कर्मचारी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मनोबल उंचावले आहे.
भेटीच्या शेवटी मा.सचिव महोदय यांनी प्रकल्प कार्यालयास भेट देवून राणी दुर्गावती माहिती सुविध केंद्र आणी प्रकल्प कार्यालयामार्फत नाविण्यपूर्ण योजनेतुन नव्यानेच राबविण्यात येत असलेल्या सोयी सुविधायुक्त फिरते ईलेक्ट्रिानिक प्रचार प्रसिध्दी वाहन तसेच स्वच्छता मशिन ची पाहाणी करुन आधुनिक यंत्रणमुळे कमी कर्मचाऱ्याच्या मदतीने शाळा व वसतीगृह स्वच्छता राहण्यास मदत होईल तसेच फिरते ईलेक्ट्रिानिक प्रचार प्रसिध्दी वाहनाच्या मदतीने विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाची प्रसिध्दी होऊन आदिवासी बांधवापर्यंत योजनेचा लाभ देवुन विकास साधता येईल असे मत व्यक्त केले. प्रकल्प अधिकारी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प
देवरी,जि गोंदिया.




