Published:

गिरोला येथील रानमेवा पार्क मधे योगाभ्यास

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिन रानमेवा पार्कमध्ये उत्साहात साजरा

साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)

21 जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सालेकसा तालुक्यातील गिरोला येथील रमणीय रानमेवा पार्क मध्ये भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भूषण बूराडे यांच्या अध्यक्षतेखाली सौ. रविताताई मेंढे सरपंच, गिरोला यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी योगा अभ्यासक माजी सैनिक योगेंद्र टेम्भरे व सौ. पुष्कलाताई कटरे पतंजली यांनी योगाचे महत्त्व विशद करून प्रत्यक्ष योग प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष देवराम चुटे, भाजप व्यापारी आघाडी जिल्हा महामंत्री सुनील अग्रवाल, ओबीसी आघाडीचे अरविंद फुंडे, महामंत्री रामदास हत्तीमारे, नगरपंचायत सदस्य सौ. योगिताताई असाटी, मधुकर हरिनखेडे, प्रेषीत बिसेन, रमेश बिसेन, रवींद्र तूरकर, यांच्यासह सालेकसा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध संस्था व समित्यांचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिकांनी स्वयंउत्स्फूर्त सहभाग नोंदवत “करू योग, राहू निरोग” हा संदेश जनमानसात पोहोचविला. योगामुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य लाभते, याची जाणीव उपस्थितांना करून देण्यात आले. निरोगी शरीर, सशक्त मन आणि विकसित राष्ट्र घडविण्यासाठी योगाचा अंगीकार करूया! योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी, संतुलित आणि आनंदी जीवन जगण्याची प्रभावी जीवनशैली आहे असे मत योगा अभ्यासक माजी सैनिक योगेंद्र टेम्भरे यांनी व्यक्त केले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: गिरोला येथील रानमेवा पार्क मधे योगाभ्यास, ID: 30990

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर