भारतामध्ये ओबिसी चा स्वतत्र कालमसाठी सरकारला अल्टीमेटम

गोंदियाः- भारतामध्ये सर्वात मोठा समाज म्हणजे ओबिसी समाज आहे. भारत जेव्हा पातत्र्यात होता तेव्हा भारतामध्ये ओबिसी समाजाची जनगना करण्यात आली.भारताची जनगना 1931 ला करण्यात आली.त्यानंतर भारताला 1947 ला स्वातंत्र मिळाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला काद्यानुरुप चालविण्यासाठी संविधानाची निर्मिती करण्यात आली.संविधानानुसार भारतामध्ये जे घटक आहेत.त्या घटकांना समानता मिळाली पाहीजे त्यासाठी सर्व समाजाची जनगना झाली पाहीजे त्या समाजातील लोकांना न्याय मिळाला पाहीजे त्यासाठी जनगना होणे आवश्यक आहे.              भारतामध्ये  विविध जाती आहेत त्या जाती कॅटेगिरी मध्ये विभागल्या आहेत.ओबिसी,एस.सी,एस.टी,ओपन अशा प्रकारे जाती आहेत.भारतातील लोकांचा विकास करायचा असेल तर प्रत्येक कॅटेगिरी ची मोजणी होणे आवश्यक आहे त्यांच्याकडे किती संपत्ती आहे.त्यांचा समाजातील लोकांचा शिक्षण किती झाला.किती टक्के लोग नौकरी वर आहेत.किती लोग बेरोजगार आहेत.किती लोकांना सांविधानिक पदावर संख्येनुसार जागा मिळाल्या आहेत का हे माहिती मिळण्यासाठी जनगना होणे आवश्यक आहे.                                                                              भारतामध्ये काॅग्रेस व बीजेपी पक्षाने सत्ता भोगली त्यांनी ओबिसी समाजाला धर्माच्या नावावर सांविधानिक अधिकारापासुन दुर ठेवण्याचे काम केले.बीजेपी पक्षाने ओबिसी समाजाची जनगना करुन म्हणुन हमी दिली आज जनगना करण्याची वेळ आली तर ओबिसी जनगना करण्यासाठी तयार नाही.                                                                                                                                                                                 आज ओबिसी संघटना दिल्ली मध्ये एकत्रित होवुन ओबिसी चा स्वतत्र कालम ची मागणी सुरु आहे.बीजेपी सरकार खरंच ओबिसी ची जनगना करेल का याकडे भारतातील ओबिसी चे लक्ष वेधले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: भारतामध्ये ओबिसी चा स्वतत्र कालमसाठी सरकारला अल्टीमेटम, ID: 31019

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर