देवरीः- देवरी (दि.२९) बोरगांव/बा. बस स्थानकासमोरुन ते उपविभागिय कार्यालय देवरी पर्यंत शेतकरी यांनी सरकार च्या ध्येय धोरणावर नाराज असुन सरकार शेतकरी वर्गाला निवडणुकित आमिष दाखवुन त्यांचे मत घेत असतो.जेव्हा शेतकरी वर्गाला त्यांचे अधिकार पाहीजे तेव्हा सरकार त्यांच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे सामान्य जनतेला रस्त्यावर आंदोलन करावे लागते. आज विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी मार्फत मुख्यमत्र्यांना निवेदन देण्यात आले.निवेदना मध्ये विविध मागण्या खालीलप्रमाणे आहेत. * नुकसानभरपाई व पडताळणी (सत्र २०२६): • शेतीचे रोग आणि किड्यांमुळे ९०% नुकसान झाले असल्याने कृषी अधिकारी व पटवारी यांच्यामार्फत पडताळणीचे आदेश देण्यात यावेत. • प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी १,००,००० रुपये रोख रक्कम खात्यात जमा करण्यात यावी. • शेतमजुरांना २५,००० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा * रब्बी हंगाम व मागील थकबाकी • रब्बी हंगामासाठी निशुल्क (मोफत) बियाणे पुरवठा करण्यात यावा.• वर्ष २०२५-२६ ची शासनाने घोषित केलेली मागील वर्षाची प्रोत्साहन रक्कम (हेक्टरी २५,००० रुपये) तात्काळ देण्यात यावी. * कर्जमाफी• वर्ष २०१७ ते २०२६ पर्यंतचे संपूर्ण कर्ज माफ करून सातबारा (७/१२) कोरा करण्यात यावा.• नेहमी (नियमित) कर्ज भरणार्या शेतकऱ्यांना विशेष सवलत/लाभ मिळावा. * योजनांचा विस्तार:• शेतकरी सन्मान निधीचा लाभ सर्व शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांनाही देण्यात यावा. वरील मागण्या पुर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. वरील मोर्चाचे नेतृत्व श्री-सुरेशकुमार सोमाजी भोंगाडे,श्री- मधुकर पुराम,श्री-शामलालजी मडावी,चंद्गकुमार हिरामनजी कोराम,बबलुजी खोटोले,श्री-पुणाराम तुलावी,श्री- केवळराम मडावि व इतर पदाधिकारी व शेतकरी मोर्चात उपस्थित होते.




