लंडन किंवा अमेरिकाचे डॉलर वाढला की सोन्याचा रेट वाढतो गोंदियाः- भारतातील लोकांना सोना हा अत्यंत महत्वाचा दागिना वाटतो.भारतात सोना हा गरीब व्यक्ती असला तरी आपल्या मुलीला,पत्नीला घेवुन देतो.आज समाजात स्त्री ही सोना घातल्याशिवाय राहुु शकत नाही. दिवाळी,धनतेरस, लग्न सभारंभात मुलीला हार,नथनी,कुडंल संपुर्ण साज घ्यावा लागतो आपल्या समाजातील लोकांना 24 कॅरेट,22 कॅरेट,18 कॅरेट हे समजत नाही आपले लोग सोना म्हणजे कोणताही भेटला तो स्विकार करतात.समाजातील लोकांना सोन्याचे मुल्य माहित नसल्यामुळे ग्रामीण भागातील सोन्याचे दुकानदार 20 कॅरेट सोना देवुन ग्राहकांकडुन 24 कॅरेट चे रेट लावुन त्यांच्या कडुन पैसा लुटल्या जातो. आमगांव,गोंदिया,देवरी,सडक अर्जुनी ह्या तालुक्यात सुध्दा मोठी तफावत दिसुन येते.ग्राहकांनी सोना खरेदी करतांनी हॉलमार्क+एचयुआयटी नंबर बघुनच सोना खरेदी करावा.




