देवरीः- महाराष्ट्र शासनाने ई-पिक प्रणाली सुरु केली आहे.त्यामध्ये सर्व शेतकरी लोकांचे गट क्रमांक नकाशा अपलोड केला आहे. ई-पिक पाहणी ही महत्वाची गोष्ट आहे.कारण यांच्यामुळेच पीक विमा,अनुदान,कर्जमाफी आणि नुकशान भरपाई मिळते. ई-पिक पाहणी म्हणजे काय? पुर्वी तलाटी येवुन पिकांची नोंद करित होता.आता सरकारने सांगितले आहे.शेतकरी स्वत:मोबाईल वरुन आपल्या शेतातील पिकांची नोंद करेल त्यालाच ई-पिक पाहणी म्हणतात.जर नोंद नाही केली तर 7/12 वर पीक पेरा रिकामा राहील आणि शेतकरी यांना एक रुपयाही मिळणार नाही. ई-पिक पाहणीचे फायदे १) पिक विमा (crop Insurance) चा पैसा थेट मिळतो. २) दुष्काळ/अतिवृष्टी झाली तर भरपाई मिळते. ३) बॅकेकडुन कर्ज घेतांना 7/12 वर पीक दाखवावे लागते. शेतकरी ई-पिक करण्यास तयार आहे पण प्रत्यक्षात शेती वर गेल्यावर ई-पिक मध्ये गट क्रमांक व नाव दिसत नाही यासाठी जबाबदार कोन यांची विचारणा शेतकरी करित आहे. शासनाने दुरुस्ती करुन शेतकरी यांची पिक पाहणी करण्यासाठी मदत केली पाहीजे.



