प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूलतर्फे स्पर्धेचे आयोजन; आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत विजेत्यांचा गौरव गोंदिया : विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाला चालना देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल, गोंदिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंटरस्कूल ब्रेन ब्रॉस्टर मेगा जीके क्विझ स्पर्धेत ‘टीम ब्रह्मास्त्र’ने विजेतेपद पटकाविले. ४ ऑक्टोबर रोजी प्रोग्रेसिव्ह स्कूल, चुलोद येथे झालेल्या अंतिम फेरीत राज्य मंडळाच्या इंग्रजी माध्यमातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.
या संघात समर्थ श्रीवास्तव (दहावी), नैतिक रहांगडाले (नववी) आणि जय गायधने (आठवी) यांचा समावेश होता. विजेत्या संघाला प्रथम क्रमांकाची चषक देऊन गौरविण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मराठी, हिंदी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांसह राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाच्या शाळांनी सहभाग घेतला. विविध फेऱ्यांनंतर एकूण १२ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान, आकलनशक्ती आणि समयसूचकता यांची कसोटी या स्पर्धेत पाहायला मिळाली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विनोद अग्रवाल, डॉ. अमित जयस्वाल आणि श्री. मोदी उपस्थित होते. प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूलचे सचिव नीरज कटकवार यांच्यासह विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: ‘टीम ब्रह्मास्त्र’ इंटरस्कूल मेगा जी के क्विझची विजेती, ID: 31086
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: ‘टीम ब्रह्मास्त्र’ इंटरस्कूल मेगा जी के क्विझची विजेती, ID: 31086
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]
थेट क्रिकेट स्कोअर



