जिल्हा परिषद शाळांमध्ये परस्पर शिक्षक वा स्वयंसेवक नियुक्त करण्यास मनाई

गोंदिया, दि. 19 : जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत कार्यरत सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही त्रयस्थ संस्था, स्वयंसेवी संस्था, खासगी संघटना अथवा इतर बाह्य यंत्रणेमार्फत परस्पर स्वयंसेवक, शिक्षक किंवा अध्यापनासाठी व्यक्ती नियुक्त करण्यास मनाई करण्यात आली आहे. सक्षम प्राधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी व अधिकृत मान्यता नसताना अशा व्यक्तींना शाळेत रुजू करून घेऊ नये, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांनी दिली आहे.
जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती, अध्यापन कार्याचे नियोजन तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी ही शासनाचे प्रचलित नियम, शासन निर्णय, परिपत्रके आणि सक्षम प्राधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसारच करणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही त्रयस्थ संस्था अथवा बाह्य यंत्रणेने शिक्षण विभागाची किंवा सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्वपरवानगी आणि अधिकृत मान्यता घेतल्याशिवाय शाळांमध्ये स्वयंसेवक अथवा शिक्षक नियुक्त करू नयेत. तसेच, अशा व्यक्तींकडून अध्यापनाचे काम करून घेणे किंवा त्यांना नियमित शैक्षणिक कामकाजात सहभागी करून घेणे टाळावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शाळांचे मुख्याध्यापक आणि संबंधित शाळा व्यवस्थापन यांनीही अशा प्रकारच्या नियुक्त्या परस्पर करू नयेत. कोणत्याही त्रयस्थ संस्थेकडून शाळेत स्वयंसेवक अथवा शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाल्यास, सक्षम प्राधिकाऱ्यांचे अधिकृत मान्यता पत्र तपासून त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी. अधिकृत मान्यता नसलेल्या व्यक्तीस शाळेत रुजू करून घेऊ नये, अशा सूचना देण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील प्राथमिक, माध्यमिक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांनी या सूचनांची नोंद घेऊन त्यांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांनी केले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: जिल्हा परिषद शाळांमध्ये परस्पर शिक्षक वा स्वयंसेवक नियुक्त करण्यास मनाई, ID: 31171

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर