उन्हाळी हंगामासाठी पाणि द्या नाहीतर शेतकरी बांधवाचा सरकार विरोधात एल्गार- माजी आमदार सहेषराम कोरेटे

सिरपुरबांध धरणात ८० टक्के पाणि असुन शेतकरी लोकांना उन्हाळी हंगामासाठी पाणि नाही देवरी येथिल सुफलाम कंपनीला लाखो                                            लिटर पाणि का? दुष्काळ कंपनीवर नाही का ?

देवरीः- (दि.27) देवरी तालुक्यातील ग्रामपंचायत सिरपुरबांंध येथिल मौजा मकरधोकडा येथे संपुर्ण गावावरुन शेतकरी एकत्रित येवुन सरकारच्या ध्येय धोरण काय आहेत.या बदल सविस्तर चर्चा करण्यात आली.मागील वर्षी शुध्दा सिरपुरबांध धरणालगत शेतकरी लोकांना पाणि मिळणार नाही अशी भुमिका आखण्यात आली होती.शेतकरी लोकांनी एकत्रित येवुन आपल्या मागण्या संदर्भात आवाज उठविला होता.                                           शेतकरी लोकांची ठाम भुमिका अशी आहे की महाराष्ट्रात दुष्काळ झाला मान्य आहे.मग शेतकरी लोकांना बंदी व देवरी येथे सुफलाम कंपनीला लाखो टन पाणि जातो त्याचं काय ह्या संदर्भात सुध्दा चर्चा करण्यात आली.शेतकरी लोकांचे म्हणणे असे आहे की सिरपुरबांध धरणात ८० टक्के पाणि असुन शेतकरी उन्हाळी हंगामापासुन वंचित राहणार कसा या बदल चर्चा करण्यात आली. शेतकरी यांना २४ तास लाईट मिळणे आवश्यक आहे.५००० हजार बोनस पण भेटला नाही.                                                                                                                                          आजच्या सभेला संबोधित करत असतांनी माजी आमदार सहेषराम कोरेटी यांनी सांगितले की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना शुध्दा निवेदन देवुन आमगांव विधानसभेतील ५ ते ६ धरणे भरुन असतांनी तुम्ही शेतकरी लोकांना उन्हाळी हंगामासाठी पाणि दिले पाहीजे या बदल निवेदन दिले आहे.शेतकरी लोकांना बोनस भेटले पाहीजे या बदल पण चर्चा केली. लोकांनी संघटित राहुन स्वतःची लढाई स्वतःलढाईची आहे.त्यासाठी समस्त शेतकरी बांधवानी येणा-या काळात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याची तयारी ठेवा त्यामध्ये समस्त शेतकरी बांधवानी आपण व पत्नी,मुले घेवुन आंदोलनात सहभागी होण्यासाठी सर्व शेतकरी बांधवानी यावे. आपण पाणी मागण्याची भुमिका ठाम ठेवुन पाणि घेवुच अशी भुमिका ठेवावी.                                                                                                                                                                        शासनाने व पाटबंधारे विभागाने योग्य नियोजन करुन शेतकरी बांधवाना न्याय दिले पाहीजे नाहीतर महा एल्गार होणार अशी भुमिका शेतकरी घेणार आहेत.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: उन्हाळी हंगामासाठी पाणि द्या नाहीतर शेतकरी बांधवाचा सरकार विरोधात एल्गार- माजी आमदार सहेषराम कोरेटे, ID: 31388

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर