ओबीसी सेवा संघ /ओबीसी संर्घष कृती समिती/ओबीसी जनगन्ना परिषद ने घेतला पुढाकार देवरीः- दि.०२ जुलै २०२३ ला ओबीसी सेवा संघ /ओबीसी संर्घष कृती समितीने संपुर्ण महाराष्ट्रात स्थानिक आमदारांना इतर मागास प्रवर्ग,भटके विमुक्ती आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यासाठी ७२ वस्तीगृह व २१६०० विद्यार्थ्यासाठी स्वाधार योजना लवकर सुरु व्हावी यासंबधी प्रश्न उपस्थित करण्यासाठी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहेषराम कोरोटे यांच्या सोबत चर्चा करित असतांनी शासनाने जिल्हानिहाय दोन या प्रमाणे ७२ वस्तीगृह कार्यान्वित करण्यास दि.२८/०२/२०२३ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली होती.जिल्हानिहाय वस्तीगृह सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सुचना व नियमावली निश्चित करण्यासंबधाने १३ मार्च २०२३ रोजी शासन परिपत्रक काढुन सुचना देण्यात आल्या होत्या. मार्गदर्शक सुचना व नियमावली काढल्यानंतर सुध्दा आज शैक्षणिक वर्ष सुरु होवुन विद्यार्थी भंटकती करीत आहेत.तरी शासनाने काम चालु केलेले नाही या संदर्भात आपण पाऊसाळी अधिवेशनात ओबीसी वस्तीगृहाचा प्रश्न ठेवुन तात्काळ सुरु करण्यासाठी बोला. निवेदन देण्यासाठी नितेश भेंडारकर (संरपच ग्रा.पं.सिरपुरबांध) सुनंदा भुरे (प्राध्यापक मनोहर भाई पटेल ज्युनियर कॉलेज देवरी)खोटेले सर,सतदेवे सर ,दिपक कोसरकर,कृष्णा ब्राम्हणकर(ओबीसी जनगन्ना परिषद अध्यक्ष) एवढे सदस्य उपस्थित होते.