देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी घोषित

देवरी- (कन्हैया क्षिरसागर)(दि. ०२) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी देवरी तालुकाध्यक्ष यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह माॅ धुकेश्वरी मंदिर येथे नारळ फोडून पक्षाची कार्यकारिणी  पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारा सर्वदूर पोहोचविण्यासाठी पक्षाचे खंदे कार्यकर्ते देवरी तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहेत. देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे यांनी तालुका कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यावेळी गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दिलीप जुळा, जिल्हा महासचिव बिसराम सलामे, जिल्हा सचिव महेंद्र निकोडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्या मंजुषाताई वासनिक, ईशिका उके यांच्या प्रमुख उपस्थितीत देवरी तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष -विलास पंढरी चाकाटे, तालुका महिला अध्यक्ष – आरती जागळे, तालुका युवक अध्यक्ष – अरुण आचले, उपाध्यक्ष – रुपेशकुमार राऊत, तालुका महासचिव – विनोद रोकडे, झुलनबाई नागपुरे, कोषाध्यक्ष – कैलास मरस्कोले, जिल्हा परिषद प्रमुख -, दुर्गेश शेंडे, प्रशांत देसाई, ईश्वर मेश्राम, किरण चौधरी, सदस्य पदी प्रल्हाद चौधरी, सलमा पठाण, रशिदा बंदेअली, रिमुताई निकोडे, मुक्ता सलामे आदीची निवड करण्यात आली.
गेल्या कित्येक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशान्वये प्रदेश उपाध्यक्ष बजरंगसिह परिहार यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र देऊन माझी देवरी तालुका अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते (प्रफुल्ल पटेल गटातील) काही कार्यकर्त्य आमच्या पक्षात सहभागी होण्यास इच्छुक आहेत. त्यांचे स्वागत करतो. देवरी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट करण्यासाठी भर देणार असल्याचे तालुकाध्यक्ष विलास चाकाटे यांनी सांगितले आहे.

प्रफुल्ल पटेल गटाला धसका
महाराष्ट्रात सर्वत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारे विरुद्ध प्रफुल्ल पटेल यांनी आपला वेगळा गट निर्माण करून भाजपाशी जवळीक करुन त्यांच्या विचार धारेशी जुळून सत्ता स्थापना केला आहे त्यामुळे देवरी तालुक्यात मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नवीन कार्यकारिणी करुन रमेश ताराम व सि.के.बिसेन (प्रफुल्ल पटेल गट) यांना एक धसका दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सर्वत्र बोलबाला
देवरी तालुक्यात भाजप विचार धारेशी जवळीक असणार्या कार्यकर्त्यांपासुन दूर गेल्याने मुळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (शरद पवार गटांचा) तालुक्यात सर्वत्र बोलबाला दिसून येत आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: देवरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी घोषित, ID: 29175

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर