साखरीटोला:-
महाराष्ट्र राज्यातील महायुती शासनाच्यावतीने गत वर्षी प्रमाणे यंदाही दिवाळी सणानिमित्त ‘आनंदाचा शिधा’वाटप करण्याचा निर्णय घेतला घेतला सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील लाभार्थी शिधापत्रिकाधारक कुटुंबियांना 5 नोव्हेंबर रोजी भाजप राकापाचे पदाधिकारी सुनील अग्रवाल, प्रभाकर दोनोंडे, रमेश चुटे, डाँ. अजय उमाटे, देवराम चुटे यांच्या हस्ते दिवाळी शिधा किट वितरित करून सुरुवात करण्यात आले. यावेळी मोठ्या संखेत शिधा कार्ड धारक लाभार्थी उपस्थित होते. शिधा किट साहित्यात साखर, पामतेल, रवा, चणा दाळीसह पोहे आणि मैदाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे लाभार्थी शिधाधारक गरीबांच्या ‘दिवाळीचा गोडवा’ वाढला आहे. केंद्र शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत अन्नधान्याचे वाटप लाभार्थी शिधापत्रिकाधारकांना केले जाते. महाराष्ट्र राज्यातील शिंदे, फडणवीस, पवार सरकारने गणेशोत्सवाचे निमित्त साधून राज्यातील पात्र लाभार्थ्यांना गणेशोत्सवात आनंदाचा शिधा अंतर्गत प्रत्येकी एक किलो रवा, हरभरा डाळ, साखर आणि एक लिटर पाम तेल समावेश असलेली साहित्याची किट शंभर रुपयांमध्ये वाटप केले होते. आता त्याच प्रकारची साहित्याची किट दिवाळीनिमित्त केवळ 100 रुपयांतच देण्यात येत असून यात अर्धा किलोग्रॅम पोहे आणि मैदाही देण्यात येणार आहे. मागीलवर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर राज्य सरकारने प्रथमच आनंदाचा शिधा वाटप करून त्याची सुरुवात केली होती. त्यानंतर गुढीपाडवा आणि गौरीगणपतीनंतर आता दिवाळीनिमित्य पुन्हा आनंदाचे रेशन वाटपाला सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य गटात समाविष्ट 2 लाख 42 हजार 11 शिधापत्रिकाधारकांचा समावेश आहे. या कुटुंबांना दिवाळीसाठी आनंदाच्या शिधा योजनेचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यातील 999 प्राधिकृत धान्य दुकानातून आनंदाच्या शिघाचे वाटप करण्यात येणार आहे. केवळ शंभर रुपयात सर्व जिन्नस लाभार्थ्यांना देण्यात येत आहे.




