Published:

शितरू पाटील बाबा मंदिरात प्राणप्रतिष्ठा व ज्योत प्रज्वलन कार्यक्रम

🔽चुटे कुटूंबियांचे कुलदैवत कट्टीपारला येणार
​साखरीटोला-: (रमेश चुटे) जवळच असलेल्या कट्टीपार येथे आज ३ एप्रिल २०२६ शुक्रवार रोजी श्री शितरू पाटील बाबांच्या मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य ज्योत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी ‘चुटे’ परिवार आणि ग्रामस्थांकडून जय्यत तयारी सुरू आहे. याच दिवशी ग्राम ‘मासळ’ येथून चुटे परिवाराचे कुलदैवत दर्शनासाठी कट्टीपार येथे आणले जाणार आहे. भाविकांना ३ आणि ४ एप्रिल या दोन दिवसांत दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. ​शनिवार, ४ एप्रिल रोजी ज्योत विसर्जन, दहीकाला आणि त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या धार्मिक सोहळ्याला समस्त चुटे परिवार आणि भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चुटे परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शितरू पाटील बाबा मंदिरात प्राणप्रतिष्ठा व ज्योत प्रज्वलन कार्यक्रम, ID: 30913

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर