Published:

नेहलचा षटकार का तोफेचा गोळा! टाटाच्या कारवर डेन्ट; आता मिळणार ५ लाख…

मुंबई: मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला. रॉयल चॅलेंजर्सने मुंबई इंडियन्सपुढे २०० धावांचं लक्ष्य ठेवलं. या सामन्यात पुन्हा एकदा सूर्य कुमार यादवची धडाकेबाज खेळी पाहायला मिळाली. त्याने ३५ चेंडूत ८३ धावा करत मुंबई इंडियन्सला विजय मिळवून दिला. पण, या सामन्यात फक्त सूर्या नाही तर आणखी एका खेळाडूची चर्चा झाली. तो म्हणजे नेहल वढेरा. या सामन्यात वढेराने ३४ चेंडूत ५२ धावांचे नाबाद अर्धशतक झळकावले.या सामन्यात नेहलच्या एका षटकाराने संपूर्ण वानखेडे स्टेडियमध्ये खळबळ उडवून दिली. नेहलचा हा एक षटकार तब्बल ५ लाखांना पडला. पण, याने नुकसान नाही तर फायदाच झाला आहे.

ना राहायला घर, ना खायला पैसे; डोळे बंद करुन एक निर्णय घेतला अन् झाली ४१ कोटींची मालकीण
नेमकं काय घडलं?

११ व्या षटकात वानिंदूने हसरंगाला उतरवलं. २२ वर्षीय वढेराने पहिल्याच चेंडूवर सिंगल घेत सूर्याला स्ट्राइक दिली. सूर्यकुमार यादवने षटकार ठोकत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आणि त्यानंतर नेहलकडे स्ट्राईक सोपवली. तरुण फलंदाजाने स्लॉग स्वीपने असा षटकार ठोकला जो थेट सीमारेषेबाहेर उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळला. हा शॉट एवढा जबरदस्त होता की कारला डेंट पडला.
आयपीएल २०२३ मध्ये नेहल वढेरा

  • २१(१३) जेव्हा MI ४/४८ होते
  • ४०(२१) जेव्हा MI ५/५९ होते
  • ६४(५१) जेव्हा MI ३/१४ होते

विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानातच भिडले; मोठी बाचाबाची, व्हिडिओ व्हायरल

आता मिळणार ५ लाख

नेहल वढेराच्या शॉटमध्ये एवढी ताकद होती की टाटाच्या गाडीला थेट डेंट पडला. अशा परिस्थितीत आता टाटा टियागो ईव्ही या शॉटच्या बदल्यात गरीबांना पाच लाख रुपये दान करणार आहे. नियमानुसार, चेंडू सरळ जाऊन गाडीवर आदळला, तर कर्नाटकातील कॉफीच्या बागांची जैवविविधता वाढवण्यासाठी पाच लाख रुपयांची मदत दिली जाते.

Rescue Operation: घनदाट जंगलात महिला अडकली, ५ दिवस फक्त दारुवर जगली, VIDEO पाहून थक्क व्हाल

Source link

Author:

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: नेहलचा षटकार का तोफेचा गोळा! टाटाच्या कारवर डेन्ट; आता मिळणार ५ लाख..., ID: 28041

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर