देवरी तालुक्यातील महिलांना पोलिस विभागावर प्रश्न चिन्ह आरोपी ला पकडण्यासाठी देवरी पोलिस असमर्थ का? देवरीः- देवरी तालुक्यात अक्षय शिक्षण संस्था देवरी व्दारा संचालित के.एस.जैन मुलीचे वस्तीगृह देवरी येथिल हा लैंगिक शोषणाचा प्रकार झाला.ती मुलगी शाळेत जावुन आपल्या शिक्षकांना सांगितल्या नंतर शिक्षकांनी त्या मुलीना घेवुन पोलिस स्टेशनला गेल्यावर तेथे मौखिक चर्चा झाल्यावर घटना १९ तारीख ची असुन गुन्हा नोंद २४ तारेखला झाला.गुन्हा नोंद झाल्यावर सदर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिस त्यांच्य़ा घरी गेल्यावर सदर आरोपी फरार झाल्याचे पोलिसांना कळले.आरोपीला कोन माहिती देतो हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिस विभागावर महिला नाराज आहेत.सामाजिक बांधिलकी ही सर्वासाठी सारखी असते.समाजात प्रतिष्ठित नागरिक आहे त्यांची ओळख राजकारण्या लोकांशी आहे म्हणुन त्याला पोलिस सहकार्य तर करित नाही अशी चर्चा देवरी येथिल नागरिकांची आहे. कायदा हा सर्वासाठी सारखा आहे ज्या व्यक्तीने गुन्हा केला आहे त्याला सजा झालीच पाहीजे.जर त्यांच्या वर कार्यवाही झाली नाही तर येणा-या काळात देवरी तालुक्यातील महिला सुरक्षित राहणार का? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. देवरी येथिल महिलांचा संयम हा पोलिस विभागाने बघु नये पोलिसांनि आरोपिला जर तात्काळ अटक केली नाही तर संपुर्ण तालुक्यातील महिला पोलिस विभागावर मोठा आंदोलन करुन महिला शक्तीची ताकत दाखवु अशी चेतावनी महिला शिष्टमंडळानी पोलिस विभागाला दिलेली आहे.




