<p><br />कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी १० मेला मतदान होणार आहे… विधानसभा निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष – भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न आज करतील…. कॉग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची आज प्रचार सभा, रोड शो, आणि पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी सोनिया गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत तर <br />राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज निपाणीत शरद पवार यांची सभा होणार आहे. </p>
Post Views: 47