प्रदीप कुरूलकर हनीट्रॅपमध्ये कसे अडकले?
एटीएसचे अधिकारी सध्या प्रदीप कुरुलकर यांची कसून चौकशी करत आहेत. प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्याकडून भारताविषयीची गोपनीय माहिती काढून घेतल्याचे वृत्त समोर आले होते. कुरूलकर यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात आले असले तरी संबंधित महिलेने त्यांना ब्लॅकमेल केले नव्हते. या महिलेने कुरुलकर यांच्याशी प्रेमाने आणि गोडगोड बोलून माहिती काढून घेतली. ‘मला भारतीयांचा अभिमान आहे. तुम्ही चांगले शास्त्रज्ञ आहात. मी पण भारतीय आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात, त्याच क्षेत्रात मलाही देशासाठी काहीतरी करायचं आहे’, असे ही महिला कुरुलकर यांना सांगत होती. याचदरम्यान बोलण्यात गुंतवून गोडीगुलाबीने महिलेने ब्राह्मोस, अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्रांविषयीची गोपनीय माहिती कुरूलकर यांच्याकडून काढून घेतल्याचा संशय आहे. एटीएसचा जो अधिकारी महिलेच्या संपर्कात आला होता, त्यानेदेखील कोणती गोपनीय कागदपत्रं पाकिस्तानला दिली आहेत का, याचा शोध एटीएसकडून घेतला जात आहे. दरम्यान, एटीएसच्या अधिकाऱ्यांकडून आतापर्यंतच्या चौकशीत समोर आलेली माहिती पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना दिली आहे. ज्या मोबाईल नंबरचा वापर करुन प्रदीप कुरुलकर यांना हनीट्रॅपमध्ये फसवण्यात आले, त्याची माहिती काढण्याचे काम सुरु आहे.
Pune News: प्रदीप कुरुलकरांचा पाय आणखी खोलात: फोटो, व्हिडिओसह फाईल्स शेअर केल्याचं ATS तपासात उघड
कुरूलकरांचा ई-मेलवरुन पाकिस्तानशी संपर्क
संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई- ई) संचालक डॉ. प्रदीप मोरेश्वर कुरुलकर यांच्याकडून संदेशांची देवाण-घेवाण झालेले संशयित मेल आयडी पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. गुगल कंपनीने यासंबंधीचा अहवाल दिला असल्याचे दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात सुनावणीदरम्यान सांगितले. मात्र, मेलद्वारे नेमके काय संभाषण झाले, हे अद्याप समोर आलेले नाही. कुरुलकर यांनी देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काही महत्त्वाचे फोटो शेअर केले असल्याचेही समोर आले आहे. न्यायालयाने या प्रकरणात कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पाकिस्तानी गुप्तचरांच्या हस्तकांना गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दिघी येथील अभियांत्रिकी संशोधन व विकास संस्थेचे (आर अँड डीई- ई) संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना तीन मे रोजी ‘एटीएस’ने अटक केली. कुरुलकर यांच्याविरोधात ‘डीआरडीओ’च्या दक्षता आणि सुरक्षा विभागाचे संचालक कर्नल प्रदीप राणा यांनी तक्रार केली आहे.