Published:

Big boss 16: रॅपर एमसी स्टॅनने पटकावली 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी

बिग बॉस 16′ च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी ‘बिग बॉस’ची चमकणारी ट्रॉफी एमसी स्टॅनच्या नावावर आहे.

‘बिग बॉस’च्या घरात प्रत्येकजण ट्रॉफीसाठी लढत आहे आणि त्यापैकी एक होता MC स्टॅन, ज्याने सर्वांना हरवून ट्रॉफी जिंकली आणि आता तो ‘बिग बॉस 16’ चा विजेता बनला आहे. एमसी स्टॅन त्याच्या रॅप गाण्यांसाठी तरुण पिढीमध्ये आधीच प्रसिद्ध होता आणि आता तो प्रशंसा मिळवत आहे.

१२ फेब्रुवारी संध्याकाळी ७ वाजल्यापासून ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. यंदा ‘बिग बॉस’च्या पर्वात सहभागी झालेले सर्व स्पर्धक या कार्यक्रमावेळी उपस्थित होते. यावेळी या स्पर्धकांनी टॉप ५ स्पर्धकांबरोबर विविध खेळ खेळले. त्यांच्यात विविध गंमतीजमतीही पाहायला मिळाल्या.

टॉप ५ मध्ये शिव ठाकरे, प्रियंका चाहर चौधरी, एमसी स्टॅन , अर्चना गौतम आणि शालीन भनोट यांनी बाजी मारली होती. दरम्यान आता या पर्वाला टॉप ३ स्पर्धक मिळाले असून ताकदीच्या दोन स्पर्धकांना घराबाहेर पडावे लागले.

आधी शालीन आणि आता अर्चना घराबाहेर पडली. या दोघांकडेही विजेतेपदाचे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून लोकप्रियतेच्या बाबतीत ते कमी पडत होते.

विविध मीडिया ट्रेंडनुसार टॉप ५ मध्ये ते दोघे काय चौथ्या आणि पाचव्या स्थानी होते. या ट्रेंडनुसारच या दोन्ही स्पर्धकांचे एलिमिनेशन झाले.

अखेर ‘बिग बॉस हिंदी’च्या टॉप पाच स्पर्धकांपैकी शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे टॉप २ स्पर्धक होते. त्यात एमसी स्टॅन हा ‘बिग बॉस’ हिंदीच्या १६ व्या पर्वाचा विजेता ठरला. त्याला ‘बिग बॉस’ची चमकती ट्रॉफी मिळाली. त्याबरोबर त्याला ३१ लाख रुपयेही मिळाले.


Source link

Author:

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: Big boss 16: रॅपर एमसी स्टॅनने पटकावली 'बिग बॉस 16'ची ट्रॉफी, ID: 28086

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर