नागरिक सह.पत संस्थेच्या संचालकाविरुध्द अभिकत्यांचे आमरण उपोषण देवरी- देवरी शहरातील देवरी नागरीक सहकारी पतसंस्थेव्दारा डीसेंबर 2022 पासुन ग्राहकांच्या ठेवीची रक्कम परत न मिळाल्यामुळे तसेच एजंटाचे कमीशन न मिळाल्यामुळे ,एजेटासमोर उपासमारीची तसेच ग्राहकांच्या ठेवीची रक्कम भरुन देण्याची वेळ आली आहे.यावर एंजट यांनी संचालकाला कमिशन आणि ग्राहकांच्या ठेवीच्या रकमे विषयी विचारपुस केली असता,संचालक उडवा उडवीचे उत्तरे देवुन आपली हुकुमशाही गाजवत मनमर्जी ने कारभार चालवीत आहे.याबाबत वारंवार पाठपुरावा करुन शुध्दा संबधित विभाग आणि प्रशासनाने यांची दखल घेतली नाही.त्यामुळे १२ मे पासुन बेमुदत आमरण उपोषण एजंट यांनी स्विकारले सविस्तर असे की,गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात देवरी नागरिक सहकारी पतसंस्था र.न.१३३५ ब-याच वर्षापासुन कार्यरत आहे.या पंतस्थेमध्ये एकुण ८ एजंट असुन,तीन टक्के कमीशन तत्त्वावर देवरी शहरातील तसेच देवरी शहराबाहेरील नागरिकांचे रोजचे पेैसे जमा करुन,नियमितपणे देवरी नागरिक पंतसंस्थेत जमा करीत होते.आम नागरिक सुध्दा दररोजचे आपले कसेबसे थोडे-थोडे पैसे जमा करुन एका वेळेस निघणारे पैसे कोणत्याही कामात येतात म्हणुन,या पतसंस्थेमध्ये एजंट मार्फत ठेव ठेवत होते.पण या पंतस्थेतील संचालकांनी डिसेंबर २२ पासुन ठेव ठेवणा-या एकही नागरीकांचे तसेच तेथील एजंटचे कमिशन अजुनही परत केले नाही त्यामुळे ठेवणा-या नागरिकांनी येथील एजंट लोकांना पकडुन दिलेले पैसे परत करण्याच्या तगादा लावला.संचालक रक्कम परत करीत नसल्यामुळे एकडे आड तिकडे विहीर अशी दैना या पंतसंस्थेच्या संचालक विरोधात जिल्हा प्रशासन आणि सहकार उपनिबंधक कार्यालयाकडे रीतसर तक्रार नोंदविण्यात आली.पण त्यांची अद्याप दखल घेण्यात आली नाही.त्यामुळे त्रस्त झालेल्या एजंटानी सहकार उपनिबंधक कार्यालय देवरी समोर आमरण उपोषण सुरु केले आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पुर्ण होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही.अशी भुमिका देवरी नागरिक सह.पतसंस्था येथील एजंट यांनी घेतली आहे.
