Published:

देवरी तालुक्यातील गांवाचे काम देवरी पोलिस स्टेशनालाच व्हावे यासाठी माजी आमदार संजयजी पुराम यांनी दिले निवेदन

देवरीः-  देवरी तालुक्यातील अनेक गावे ही सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येत असल्याने गावकऱ्यांना काही घटना घडल्यास , अपघात झाल्यास किंवा तक्रार करण्यास 30 ते 40 किलोमीटर अंतरावर सालेकसा पोलीस स्टेशनला जावा लागत आहे. त्यामुळे  नागरिकांना त्रास सहन करावा लागतो त्यामुळे  देवरी तालुक्यातील गावांना देवरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन माजी आमदार संजयजी पुराम यांच्या नेतृत्वात 19 मे रोजी सादर करण्यात आला आहे. आमगाव – देवरी विधानसभा क्षेत्रात तीन तालुके समाविष्ट असून आमगाव आणि सालेकसा या दोन तालुक्यांपैकी देवरी तालुका हा लोकसंख्येने व क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा मोठा आहे. त्यामुळे देवरी तालुक्यातील उत्तर भागातील पुराडा, फुक्कीमेटा, ओवारा, डोंगरगाव, हरदोली अस्या अनेक मोठ्या ग्रामपंचायत मधील गावे ही 30 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट आहेत तर तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय इतर शासकीय कार्यालय बँक व बाजारपेठ तसेच दवाखाने हे सुद्धा सर्वच देवरी  येथे आहे. त्यामुळे,कोणतीही नको ती वाईट घटना घडल्यास किंवा पोलीस स्टेशन संबंधित कामासाठी नागरिकांना 40 किलोमीटर अंतरावर असलेला सालेकसा येथे जावा लागत आहे. या सर्व बिंदूवर विचार करून नागरिकांची वेळ आणि मानसिक त्रास याची बचत म्हणून सदर गावी हे सालेकसा ऐवजी देवरी पोलीस स्टेशन ला जोडण्यात यावे. यासाठी माजी आमदार तथा भाजप महाराष्ट्र कार्यकारिणीचे संजय पुराम यांच्या नेतृत्वाखाली देवरी येथील अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक बनकर यांना निवेदन देण्यात आले आहे. जेणेकरून अहवाल शासन दरबारी वरिष्ठाकडे जाऊन मागणी नक्कीच मंजूर होईल.निवेदन देतेवेळी भाजपाचे पदाधिकारी तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद संगिडवार, श्रीकृष्ण हुकरे, सुखचंद राऊत, ययादोराव पंचमवार, गणेश भेलावे, प्रवीण दहिकर,विनोद भांडारकर,विजय कास्याप,आसाराम पालिवाल,बबलू डोये, खंदारे,राजू शाहू,धनराज कोरोडे,एकनाथ चुटे, देवकी मरई,आणि गोमती तितराम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: देवरी तालुक्यातील गांवाचे काम देवरी पोलिस स्टेशनालाच व्हावे यासाठी माजी आमदार संजयजी पुराम यांनी दिले निवेदन, ID: 28347

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर