Published:

भोषा येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन

साखरीटोला(रमेश चुटे) -: ग्रामपंचायत भोषा अंतर्गत बोदा रोड राजकुमार वैधच्या घरापासून ते नीलकंठ मटाले यांच्या घरापर्यंत १० लाख रूपयांच्या निधीतून तयार होणाऱ्या सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन 20 मे रोजी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव व माजी आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सभापती राजेंद्र गौतम, जि.प. सदस्य हणवंत वट्टी, उपसभापती नोहरलाल चौधरी, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष सेवकराम ब्राम्हणकर, भाजपचे महामंत्री अनिरुद्ध शेंडे, बाजार समितीचे संचालक हुकूम बोहरे, माजी पस सदस्य विद्यासागर पारधी, भोषा ग्रामपंचायतचे सरपंच जैवन्ताबाई मटाले, उपसरपंच श्रीकांत ब्राम्हणकर, ग्रामपंचायत सदस्य गुनेश्वर हत्तीमारे, सुनील ब्राम्हणकर, सावळराम मटाले, ताराबाई कोरे, संतकलाबाई मटाले, निर्मलाबाई शेंडे, अंजुबाई कुरंजेकर, निलूबाई शिवणकर, ग्रामसेवक अशोक बोरकर उपस्थित होते. बाजार चौकात आयोजित कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना माजी आमदार संजय पुराम म्हणाले मी माजी आमदार असलो तरी क्षेत्राच्या विकासासाठी कटीबद्ध असून सदैव तुमच्या सोबत आहे. भारत सरकार व महाराष्ट्र सरकारच्या विविध जनउपयोगी योजना गरीब शोषित पीडित समाजाच्या उत्थानासाठी सुरु असून एक ही गरीब लाभार्थी सरकारी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी भाजप कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यानी प्रयत्न करावे असे मत व्यक्त केले. प्रधानमंत्री आवास योजना, जनआरोग्य योजना, शेतकरी सन्मान योजना अश्या योजनाचा लाभ गरजू लाभार्थ्यांनां मिळाले पाहिजे यासाठी गावागावातील भाजप कार्यकर्त्यानी बघितले पाहिजे, असे उदगार माजी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव व आमदार संजय पुराम यांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी मोठया संखेत पदाधिकारी, कार्यकर्ता व गावकरी उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: भोषा येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन, ID: 28354

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर