गडचिरोली:- (हरिहर पाथोडे) कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर जिल्ह्यात सुद्धा आगामी निवडणुकात काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता स्थापन करण्याकरिता व पक्ष संघटन मजबूत करण्याकरता माजी खासदार मारोतराव कोवासे यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न झाली.
या बैठकीत कर्नाटक विजयाचा अभिनंदन प्रस्ताव काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि संपूर्ण काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या नावे पारित करण्यात आले. सोबतच काँग्रेस पक्ष हा सर्वसमावेशक पक्ष असून जिल्हा कार्यकारणीत व आगामी निवडणुकात तरुणांना आणि महिलांना मोठ्या प्रमाणात संधी देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार सत्तेत आल्यापासून मागील नऊ वर्षापासून देशात अराजकता पसरलेली आहे. सत्ताधारी सतत वाढत चाललेली महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, कृषी अवजारे, बी बियाणे यांचे दर आणि बेरोजगारी आटोक्यात आणण्यात असमर्थ ठरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जगणं कठीण झालेला आहे. त्याचप्रमाणे राज्यात सुद्धा भाजप शिंदे सरकारची सत्ता असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. जिल्ह्यातील कोनसरी प्रकल्प अद्याप सुरू झालेला नाही, सुरजागड येतील कच्चा माल जिल्ह्या आणि राज्याबाहेर विकल्या जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक युवकांना रोजगारा पासून वंचित रहावे लागत आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे. जिल्ह्यातील अजूनही अनेक सिंचन प्रकल्प प्रलंबितच आहेत. उपमुख्यमंत्र्यांकडेच ऊर्जा खाते असताना देखील आणि जिल्ह्यात कोणता मोठा उद्योग नसतानाही सतत लोडशेडिंग करून शेतकऱ्यांची वीजही कपात केली जात आहे अशा अनेक समस्या जिल्ह्याला भेडसावत आहे अश्या अनेक समस्या जिल्ह्यात असताना व भाजपचे एक खासदार, दोन आमदार असताना देखील कोणीही या समस्यांवर बोलताना दिसत नाही. सत्तेत येण्यापूर्वी आपण सत्तेत आल्यास जिल्ह्यातील ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थेत पूर्ववत आरक्षण लागू करणार असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते मात्र आता सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण होत असताना या संदर्भात कोणत्याही प्रकारच्या फडणवीस – भाजप सरकारने निर्णय घेतलेला नाही हे जिल्ह्यातील ओबीसी समाजाची साफ दिशाभूल आहे. भाजप सरकारचे हे मोठे अपयश असून आता हाच संदेश घेऊन प्रत्येक काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावातील सामान्यातील अतिसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचने गरजेचे आहे असे मत जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यात काँग्रेसची एक हाती सत्ता स्थापन करण्याकरिता पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या, गाव कमिटी मजबूत कराव्या अशा सूचना जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे.
यावेळी माजी खासदार मारोतराव कोवासे, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जि. प्र. डॉ. नामदेवराव कीरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सचिव पंकज गुडेवार, डॉ. नितीन कोडवते, महिला काँग्रेस प्रदेश सचिव डॉ. चंदाताई कोडवते, ओबीसी सेल प्रदेशउपाध्यक्ष जेसा मोटवानी, माजी जी.प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी जी.प. उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पा. नाट, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, निराश्रित विकास विभाग प्रदेश सचिव कुसुमताई आलाम, युवक काँग्रेस प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, रोजगार सेल अध्यक्ष दामदेव मंडलवार, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, अनुसूचीत सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, ग्राहक सेल अध्यक्ष भारत येरमे, परीवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी काँग्रेस अध्यक्ष छगन शेडमाके, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, चामोर्शी तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, काँग्रेस नेते परसराम टिकले, समशेरखान पठान, शँकरराव सालोटकर, माजी जी. प. सदस्य नंदू नरोटे, विनोद लेनगुरे, अब्दुल पंजवाणी, पांडुरंग घोटेकर, केसरी पा. उसेंडी, रमेश चौधरी, सुनील चडगुलवार, नेताजी गावतुरे, नितीन राऊत, सुरेश भांडेकर, भैयाजी मुद्दमवार, राकेश रत्नावार, महेश जिलेवार, नरेंद्र गजपुरे, अनिल कोठारे, मनोज ढोरे, श्रीनिवास ताटपल्लीवार, श्रीकांत कथोटे, रामभाऊ नन्नावरे, लीलाधर सुरजगाडे, गिरीधर तितराम, मनोहर निमजे, रमेश कोडापे, परिषनाथ आभारे, संजय चंने, रजनी आत्राम, आरती लहरी, अपर्णा खेवले जावेद खान, निकेश कमीडवार,
रमेश धकाते, प्रफुल आबोंरकर, रामचंद्र नैताम, मेंगाजी कोडाप, नीलकंठ गेडाम,देवेंद्र ब्राह्मणवाडे, अनिल किरमे, दिवाकर पोटफोडे, मयूर मेश्राम, रुपेश टिकले, टिकाराम निलेकार, नीलकंठ गोहने, निकेश कामडीवर, रोशनी बैस, शोभा गेडाम, स्मिता नंदेश्वर, विमल मेश्राम, सुनिता रायपुरे, कविता भगत, हरभजी मोरे, कालिदास पाल, शिवराम कुमरे, वर्षा गुलदेवकर, सुधीर तुडमवार, मिलिंद बारसागडे, समीर शेख, शुभम कीरमे, योगेंद्र झंजार, ममता पेंदाम, पुष्पा कोहपरे, विद्या कांबळे, यामिनी कोसरे, सह मोठ्या संख्येने काँग्रेस नेते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: गडचिरोली जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न, ID: 28360
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: गडचिरोली जिल्हा काँग्रेसची बैठक संपन्न, ID: 28360
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]