Published:

ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन सभा संपन्न

गोरेगांवः- (कृष्णा ब्राम्हणकर) गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यात ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन मेळावा घेण्यात आला. सर्व तालुक्यातील कार्यकर्ता सभेला उपस्थित होेते.प्रबोधन सभेमध्ये 1) ओबीसी आंदोलनाला व्यापक रुप देणे.2) 7 ऑगष्ट  मंडल आयोग दिन म्हणजे ओबीसी अधिकार दिन म्हणुन प्रचार प्रसार करणे.3)ओबीसी शिष्यवृत्ती व उपघटक योजनेच्या अंमलबजावणी अडसर समजुन घेणे.4)महाज्योती संस्थेमार्फत ओबीसी,एस.बी.सी,विजे,एनटी,विद्यार्थीसाठी राबवित असलेल्या य़ोजनांची माहीतीचा प्रसार करणे.5)ओबीसी जनगन्नेचेे महत्व व विरोधकांचे षढयंत्र समजुन घेणे.6)भांडवलवाद्यांच्या निजी भारतात व संवैधानिक भारतातील फरक समजुन घेणे.7)ओबीसी समाजाची दशा व आंदोलनाची दिशा समजुन घेणे.8) मंडल यात्रा  २०२३ चेे नियोजन करणे.                                सभेमध्ये मार्गदर्शन करतांनी मा.उमेश कोर्राम (अध्यक्ष ओबीसी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडीया ) यांनी मंडल आयोगाबदल सविस्तर चर्चा करुन सर्व ग्रामीण भागीतील ओबीसी पर्यंत जनजागृती व्हावी यांसाठी नागपुर पासुन सुरु होवुन ती  सुंपु्र्ण पुर्व विदर्भात निघेल.त्यासाठी प्रत्येक गावात ओबीसीना जागृत करणे व सभा घेणे.त्यानंतर मा.बळीराज धोटे (अध्यक्ष ओबीसी फेडेरेशन ) यांनी संपुर्ण जिल्ह्यातील ओबीसींच्या सांविधानिक अधिकाराबाबद माहीती द्यावी व सर्वांना 26 नोव्हेंबर 2023  संविधान दिवसाला भव्य विराट मोर्च्याला सर्व महीला,विद्यार्थी व पुरुषांनी सहभागी व्हावे असे आव्हान केले.तसेच मा.बबलुजी कटरे(अध्यक्ष ओबीसी संर्घष कृती समिती गोंदिया ) यांनी ओबीसी शेतक-यांची पिढवणुक सरकार कशा पध्दतीने करते यावर सविस्तर माहीती दिली.ओबीसी वर्ग धर्म व मुस्लिम विरोधात जास्त विचार करतो पण स्वतःच्या अधिकारांसाठी एकत्रित येत नाही.ही शोकांतिका आमच्या ओबीसीची आहे.ओबीसी प्रबोधन सभेतील सर्व कार्यकर्त्यांनी ओबीसी लोकांना समजावुन माहीती देणे व आंदोलनात सहभागी करुन घेणे.                                                                                                        मा.खेंमेंद्र कटरे,मा.लंजेची उपस्थित होते.कार्यक्रमांचे सुत्रसंचालन मा.भुमेश ठाकरे यांनी केले.  प्रस्ताविक मा.सावन कटरे यांनी केले.आभार प्रर्दशन मा.येळे सर  यांनी केले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: ओबीसी कार्यकर्ता प्रबोधन सभा संपन्न, ID: 28363

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर