Published:

साडे ३ वर्षाचा अनुप इंडीया बुक ऑफ रेकार्ड मध्ये चमकला

आमगांवः- (मनोज भालेकर)  अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्यांने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये मिळविला स्थान त्याच्या आठवण क्षमतेमुळे त्याला ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने केले सन्मानित कमी वयात हे यश संपादन करणारा गोंदिया जिल्ह्यातील एकमेव खेळण्याच्या वयात सांगतो देश आणि विदेशातील विविध माहिती अवघ्या फक्त साडे ३ वर्षाचा नर्सरी मध्ये शिकणारा अनुदीप अंकुश चव्हाण अवघ्या साडेतीन वर्षांचा नर्सरी मध्ये शिकणारा वडिलांचे मूळ गाव नांदेड जिल्ह्यातील माहूरगड जवळील आमनाडा वडील बुलढाणा अर्बन बँकेचे गोरेगाव शाखा व्यवथापक आई गृहिणी अनुदिप ने नुकतेच जेमतेम नर्सरी मध्ये प्रवेश घेऊन शाळेत जायला लागला. वयाच्या दुसऱ्या वर्षी ए ..बी ,…सी… डी आणि अ… आ.. ई… चे धडे गिरवत हा पुढे चालत होता. मात्र त्याची लक्षात ठेवण्याची क्षमता मोठी होती. जेव्हा अनुदिप नर्सरी मध्ये जायला लागला तर इंग्रजी शब्द, स्पेलिंग लक्षात ठेवण्याच्या क्षमता आणि गुणांची ओळख आई-वडिलांना आणि शिक्षकांना झाली. आणि यातूनच त्याचा प्रवास पुढे वाढत चालत गेला. आज अनुदीप विविध प्रकारच्या जनरल नॉलेज विषयी माहिती सांगतो, देशपातळीवरील राज्य आणि राजधानी  देशाचे प्रमुख कोण आहेत. याच्या विषयी तोंडपाठ  माहिती सांगतो आंतरराष्ट्रीय देशांच्या राजधानी  विषयी माहिती सांगतो, ए बी सी डी तसेच नावे स्पेलिंग सहीत सांगतो, एक ते शंभर पर्यंत तोंडपाठ म्हणतो, अशा अनेक गोष्टी लक्षात ठेवण्याच्या त्याच्या क्षमतेमुळे ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ ने त्याला कौतुकाचे प्रमाणपत्र दिले आहे. अवघ्या साडे तीन वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या या कर्तव्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आणि ही गोंदिया जिल्हा करिता फार गौरवाची बाब आहे…..

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: साडे ३ वर्षाचा अनुप इंडीया बुक ऑफ रेकार्ड मध्ये चमकला, ID: 28400

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर