साखरीटोला येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन साखरीटोला-: (रमेश चुटे)
आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यांची संचालक मंडळाने दखल घ्यावी असे उदगार राज्याचे माजी मंत्री डाँ. परिणय फुके यांनी व्यक्त केले. ते 29 मे 2023 रोजी महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन मुबंई अंतर्गत माँ गंगा शेती साधन सामुग्री सहकारी संस्था मर्या. साखरीटोला तालुका सालेकसा येथील शामलाल दोनोंडे यांच्या गोडावून मध्ये उन्हाळी धान खरेदी योजना 2022-23 केंद्राचे उद्घाटना प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाची अध्यक्षता कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावचे सभापती केशवभाऊ मानकर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव व माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जि.प. सभापती संजय टेभंरे, आदिवासी नेते शंकर मडावी, कांग्रेसचे तालुका अध्यक्ष राजू दोनोंडे, भाजपचे परसराम फुंडे, माजी सभापती श्रावण राणा, राकापा ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर दोनोंडे, आमगाव भाजपचे अध्यक्ष काशीराम हुकरे, सुभाष आकरे भाजप व्यापारी आघाडीचे सुनील अग्रवाल, जि.प. सदस्य वंदना काळे, उषा मेंढे, माजी सभापती लता दोनोंडे, तालुका मराठी पत्रकार संघांचे अध्यक्ष रमेश चुटे, माजी सभापती तुकाराम बोहरे, खुशाल शिवणकर, देवराम चुटे, पुर्थ्वीराज शिवणकर, डाँ. संजय देशमुख, ग्यानिराम भेंडारकर, सरपंच चंद्रकुमार बहेकार, भिकूभाऊ राहाँगडाले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता गणपती, माँ गायत्री देवी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे पूजन दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. तत्पच्छात काटा पूजन करून तीन शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले. याप्रसंगी मोठया संख्येने धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक प्रल्हाद मेंढे, शामलाल दोनोंडे, संजय दोनोंडे, दीपक मेंढे, भुवन कोरे, खेमराज बागडे, राजकुमार थेर, कुवरलाल बावनथडे, मिलिंद गजभिये, पुरणदास चुटे, उर्मिला दोनोंडे, केसरबाई बावनथडे, ग्रेडर आनंदकुमार मेंढे, लिपिक सचिन सयाम परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन देवराम चुटे यांनी तर उपस्थिताचे आभार संस्थाध्यक्ष प्रल्हाद मेंढे यांना मानले.
