आमगांवः- (हरिहर पाथोडे) ग्राम पंचायत तिगांव येथे पुण्यशोल्क अहिल्यादेवी होळकर सन्मान सोहळा दिनांक 31/ 05/ 2023 रोज बुधवार ला सकाळी 11-00 वाजता आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे विशेष अतिथि म्हणुन सौ उषाताई मेंढे जि प सदस्य अंजोरा क्षेत्र हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ के जी तुरकर सरपंच ग्राम पंचायत तिगांव होते. व प्रमुख अतिथि म्हणुन संदीप तिरेले उपसरपंच, ग्राम पंचायत सदस्य अशोक कटरे, दिनेश बोपचे, कुंदाताई शहारे, नेहाताई टेंभुरणीकर, प्रियंका डोंगरे, प्रमीलाताई बोपचे, ग्रामसेवक कुणाल मेश्राम हे होते. कार्यक्रमात एकंदर आठ उत्कृष्ट कार्य करनारी महीलांचे सत्कार करण्यात आले. त्या मध्ये आशाताई मेश्राम, संगीता दोनोड़कर, गायत्री कटरे, रेवनताई पटले, पंचशीलाताई पटले, वंदनाताई मेश्राम, डिलेश्वरी पटले, रामवंता सोनकनेवरे यांचा समावेश होता. सर्व आठ महिलांना शाल, श्रीफल, प्रमाणपत्र व स्मृति चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गावातील बंधु भगीनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मंच संचालन जयेंद्र तुरकर यांनी केले तर आभार प्रशांत तुरकर यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साठी सुनीता पारधी, धनपाल कटरे व मंगेश मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतले.