सुप्रिया सुळेंना मोठी जबाबदारी तर अजित पवार बैठक सोडून निघून गेले !
दिल्ली,दि.१० –राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एक मोठी अपडेट पुढे आलेली आहे. आज पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्ताने राजधानी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महत्त्वपूर्ण नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शरद पवार यांनी त्यांचा वारस अखेर घोषित केलेला आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी संधी देण्यात आली आहे. तर राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना पक्षाकडून व शरद पवारांकडून कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही आहे. दरम्यान, शरद पवारांच्या या घोषणेनंतर अजित पवार बैठक सोडून निघून गेली असल्याची माहिती आहे.
राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात शरद पवार यांनी ही घोषणा आज (दि.१०) केली. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांची जबाबबदारी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे देण्यात आली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, महिला, युवक- युवती, आणि लोकसभेची जबाबदारी सप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
देशातील तरूणांपुढे सर्वात मोठी समस्या बेरोजगारीची आहे. तरूणांना रोजगाराची संधी मिळत नाही. देशात ९ वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. पण जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यामुळे देशातील अनेक राज्यांत भाजपचा पराभव होत आहे. देशात बदल होत आहे. अनेक राज्यांनी भाजपला दूर ठेवलं आहे. देशात परिवर्तन करायचं असेल, तर संघटन मजबूत करायला पाहिजे. २३ जून रोजी सर्व विरोधक बिहारमध्ये एकत्र येत आहेत. सर्वांनी मिळून काम करूया आणि देशात परिवर्तन घडवूया, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.
राष्ट्रवादीला नवीन दोन कार्यकारी अध्यक्ष
शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यपदाची जबाबदारी दिली आहे. देशात परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी काही लोकांवर नवीन जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी पवार म्हणाले. मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान, गोवा, झारखंड या राज्यांच्या विधानसभेची जबाबबदारी प्रफुल्ल पटेल यांच्यावर दिली आहे. तर महाराष्ट्र, हरियाणा, महिला, युवक- युवती, आणि लोकसभेची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्यावर देण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे जनरल सेक्रेटरी सुनिल तटकरे यांच्यावर देखील ओडिशा, प. बंगाल या राज्यांसह निवडणूक आयोगाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न याची जबाबदारी दिली आहे
![Elgar Live News](https://secure.gravatar.com/avatar/74fb4f4b083185b668967fec198f3e1b?s=96&r=g&d=https://elgarlivenews.in/wp-content/plugins/userswp/assets/images/no_profile.png)