Published:

भोसा येथे शेतकरी ट्रॅक्टर मालक व पोलिसात जुंपली

आमगांवः-Elgar News सध्या पाऊसाचे दिवस सुरु होत असल्यामुळे गावातील शेतकरी व शेतमजुर घराच्या काही भागात खड्डे पडल्यामुळे आपल्या परिसरात पाऊसामुळे घराला कोणत्याही प्रकारे अडचण येवु नये तसेच घरातील जनावरे व्यवस्थीत राहण्यासाठी गोठ्या मध्ये पाऊस येण्यापुर्वी मुरुम टाकतात त्याकरिता एखाद्या शेतक-याच्या बांध्या सपाट करण्यासाठी तो शेतकरी ट्रॅक्टर ने मुरूम काढतो.
परंतु पोलीस अवैध धंद्याना पकडणे सोडुन आता ट्रॅक्टर पकडतात.                                                                                                                  अशातच भोसा येथील शेतकरी व ट्रेक्टर मालक भुमेश्वर ब्राम्हणकर आपल्या स्वतःच्या ट्रॅक्टर ने आपल्या घराकरिता शेतातील मुरुम आणत असता सायंः ५ वाजता आमगांव पोलिस ठाण्याचे हे.का. विजय चुन्नीलाल कोसमे बिल्ला क्रमांक 76528 व पोलिस शिपाई प्रविण मोगरे यांनी सदर ट्रॅक्टर पकडले व पोलिस ठाण्यात जमा कर असे बोलले त्यावर ट्रॅक्टर मालक भुमेश्वर ब्राम्हणकर यांनी ट्रॅक्टर सोडण्याची विनवनी केली.तेव्हा सदर दोन्ही पोलिसांनी १ लाख रुपायांची मागणी केली व मनोहर फरकुंडे याला पोलीसांनी बोलावले व त्यांच्या मध्यस्थीने 10000 रू. देण्याचे ठरले परंतु रूपये देण्याची ईच्छा नसतांना सुद्धा १००००रू. देण्याचे ठरले.तेव्हा शेतकरी ट्रॅक्टर मालक स्वतःजवळचे ५००० /- रु. व दुस-या व्यक्ती प्रविण धनिराम मटाले यांचे कडुन ५०००/- रु.उसणे घेवुन एकमुस्त १००००/-रु.विजय कोसमे व प्रविण मोगरे यांना दिले व प्रकरण मिटविले.परंतु पुन्हा रात्री १० वाजे सदर दोन्ही पोलीस ट्रॅक्टर मालक झोपले असतांना शेतकरी ट्रॅक्टर मालकाच्या घरी जावुन ठाणेदारचा नाव सांगुन १ लाखाची मागणी केली व एक लाख न दिल्यास ट्रॅक्टर  पोलिस स्टेशन ला जमा करतो अशी दमदाटी दिली व ट्रॅक्टर मालक व त्यांचा मुलगा सुनिल यांना अर्वाच्य शिवी देवुन गालावर मारले.त्यामुळे दोघांमध्ये भांडण होवुन मारहाण झाले तेव्हा सुनिल ब्राह्मणकर यांनी सदर पोलीसांची तक्रार मोबाईल द्वारे पोलीस अधिक्षक गोंदिया व ठाणेदार आमगांव यांना केल्याचे सांगितले. तेव्हा आमगांव पोलिस भोसा येथे जाऊन हे.का.विजय कोसमे यांना घेवुन आले.परंतु दुस-यादिवशी सकाळी 9 वाजे शेतकरी ट्रॅक्टर मालक व इतर ५ लोकांना भादंवी कलम 395,353,332,342,365,504,506,अंतर्गत अटक करुन जेरबंद केले.
सदर कार्यवाही दोन्ही पोलीस वर न करता शेतकरी कुटुंबावर केली. रात्र पेट्रोलिंग चा बहाण्याने लाचखोर पोलीसांना वाचविण्यासाठी               अवैध धंद्याचा नांव देवुन 3 शेतकरी व 1 चालक व एक अपराधी प्रवृत्तीचा अशा 5 लोकांना अटक केली. यात ठाणेदार सदर पोलीसावर काय कार्यवाही करतात असा प्रश्न भोसा येथील नागरिकांना पडला आहे ?
पुढील तपास सपोनि गणपत धायगुडे करित आहेत.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: भोसा येथे शेतकरी ट्रॅक्टर मालक व पोलिसात जुंपली, ID: 28513

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर