आमगावः- (सुरेंद्र खोब्रागडे) निटच्या परिक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल……. ज्या विद्यार्थ्यांचं डॉक्टर व्हावं हे स्वप्न असतं त्यांच्यासाठी नीटची परीक्षा फार महत्त्वाची असते. नीट परीक्षेत स्कोअर झाला नाही तर चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळणं कठीण होतं. त्यामुळे नीटला चांगले मार्क मिळावेत यासाठी विद्यार्थी रात्रंदिवस झटत असतात. मात्र स्कोअर कव्हर न झाल्याने नैराश्य येतं आणि मग विद्यार्थी टोकाचं पाऊल उचलतात.अशीच एक धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगांव येथे घडली आहे. NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने सलोनी गौतम ह्या विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचलत स्वतः च्या घरी रात्री गळफास लावून आत्महत्या केली.
नीट परीक्षेचा निकाल 13 जून रोजी रात्री अकरा वाजता लागला. त्यानंतर गुण पाहिल्यावर विद्यार्थिनीच्या पायाखालची जमीन सरकली. अभ्यास करुनही मार्क कमी मिळाल्याचा धक्का सहन झाला नाही व या विवंचनेत असताना आई वडिलांनी कमी गुण पडल्याने मुलीची समजुत काढुन पुन्हा रिपीट करण्याचा सल्ला दिला. परंतु सलोनी ने आपल्या मनावर घेतलं आणि रात्री घरातील सगळे झोपलेले असताना तीने पंख्याला गळफास लावून आयुष्य संपविले.
सलोनी च्या गेल्यामुळे आमगांवात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
