पाटबंधारे कर्मचाऱ्यांच्या नजरेत आला प्रकार : कारवाईकडे लागल्या नजरा शिरपुरबांधः- शिरपूर बांध येथील धरण परिसरातून मोठ्या प्रमाणात मुरुमाचे अवैध उत्खनन होत आहे. विशेष म्हणजे, सुरू असलेला हा प्रकार पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या नजरेत आला असून त्यांनी जागेवर जावुन कालवा निरिक्षक देवराम परसराम बेलपांडे व त्याचे सहयोगी रात्री गस्त घालीत असतांना दिसुन आले.धरण परिसरात पहाटे ४ वाजता १ जेसीपी व ५ हायवा डप्पर अवैध रित्या मुरुम तस्करी करतांना आढळुन आले. दिनांकः- ०४/०६/२०२३ ला तक्रार पाटबंधारे विभाग, तहसीलदार तसेच पोलिस विभागाकडे केली आहे. अशात आता या तस्करांवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत .खनिज तस्करांवर नियंत्रण नाहीच. गौण खनिज तस्करी मोठ्या प्रमाणात सुरु असून यावर पोलिस विभाग तसेच महसूल विभागाकडून कारवाया केल्या जातात. मात्र यानंतरही तस्कर गब्बर झाले असून ते कुणालाही न जुमानता बिनधास्तपणे गौण खनिज तस्करी करीत आहेत. परिणामी गौण खनिज तस्करीचा धंदा सुरूच आहे. आता या प्रकरणात प्रशासनाकडून काय कारवाई होते याकडे लक्ष लागून आहे. मात्र यानंतरही तस्करी काही थांबणार नाही.अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग, उपविभागीय अधिकारी कार्यालय देवरी, तहसीलदार देवरी, उपविभागीय अभियंता पाटबंधारे विभाग आमगाव, पोलिस निरीक्षक देवरी, ठाणा प्रभारी पोलिस स्टेशन बागनदी (छ.ग.) यांना पत्र पाठवून माहिती दिली. आता या अवैध उत्खननावर काय कारवाई केली जाते, याकडे जनतेचे लक्ष लागले असून या तस्करांवर वेळीच अंकुश न लावल्यास त्यांचे मनोबल वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
