आमगांवः-Elgar Live News ची सत्यता.
आमगांव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विजय चुन्नीलाल कोसमे व पोलीस शिपाई प्रविण मेगरे हे दि.10 जुन ला सायंकाळी 5 वाजता मुरूम वाहतूक करणा-या शेतकरी ट्रॅक्टर मालकाकडुन 10 हजार रू.घेवुन प्रकरण मिटविले व त्याच दिवशी पुन्हा रात्री 10 वाजे जाऊन 1 लाख रूपयाची मागणी करणा-या विजय कोसमे व प्रविण मेगरे यांनी ट्रॅक्टर मालकाला दमदाटी दिल्याने भांडण झाले असता शिपाई प्रविण मेगरे हे पळून गेल्याने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी प्रविण मेगरे याला निलंबित केले. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. परंतु कर्तव्यात कसूर करून कार्यवाही न करता लाच मागणा-या व पोलीसांची प्रतिमा मलिन करणा-या विजय कोसमे व ज्यांच्या अधिपत्याखाली कार्य करणा-या पोलीस निरीक्षक यांना क्लिन चिट कशी काय ?
हा प्रश्न ही अनुत्तरित आहे.
एक करते करणी व पुर्ण ठाण्याची बदनामी होते व म्हणून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सदर प्रकरणाच्या मुळात जाऊन उप अधिक्षक स्तरच्या वरिष्ठ अधिका-या कडुन चौकशी करावी.अशी मागणी भोसा येथील सामान्य जनतेकडून होत आहे.
