देवरीः- ट्रकच्या धडकेत बापलेकाचा मृत्यू डोंगरगाव डेपो गावा नजिक राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झालेली असून 24 तारीखे ला देवरी तालुक्यातील लोहारा येथील रहिवासी असलेले सुनील पोगळे अंदाजे वय ३५ वर्षे आणि सेवकराम पोगळे अंदाजे वय ६० वर्षे नागपूर वरून स्वतःच्या राहते गाव लोहारा येथे येत असतांना भरधाव ट्रकने दुचाकीला मागून धडक देवून चिरडल्यामुळे भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर घटनेमुळे लोहारा गावात शोककळा पसरली आहे. व पुढील तपास पोलिस करित आहे.
Author: Elgar Live News
Post Views: 73