साकरीटोलाः- (रमेश चुटे) बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी गोंदिया तर्फे साकरीटोला येथील येशोधरा लॉन मध्ये राजर्षी शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यातील लोकांना आमंत्रित करण्यात आले होते.त्यामध्ये सर्व जिल्ह्यातील लोक कार्यक्रमाला उपस्थित होते.जयंती का साजरी करावी या निमित्तीने प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री-अंनतरामजी कोरे (वायुसेना मधील राष्ट्रपती पुरस्कार समान्नीत) कार्यक्रमाचे उदघाटक श्री- सुरेश कुंभलवार सर,आंमगाव, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री- ईश्वरजी कोल्हारे (सामाजिक कार्यकर्ता) कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री- डी.एस.मेश्राम (विदर्भ सचिव BRSP ) प्रमुख कार्यकर्ता मेघनाथजी भेंडारकर हे मंचावर उपस्थित होते.मार्गदर्शन करत असतांनी कार्यक्रमाचे अध्यक्षांनी आज देशातील राजकारण हे महापुरुषांच्या विचारांवर न चालता स्वार्थासाठी सामान्य लोकांचे रक्त पिवुन मोठे -मोठे बंगले बांधुन मोठ्या गाड्या दाखवुन फक्त युवकांना व्यसनात फसवुन आपली पोळी शेकण्याचे राजकारण चालु आहे.म्हणुन युवकांनो अभ्यास करा व स्वतःचे विकास करुन समाजाला न्याय देण्यासाठी काम करा. कार्यक्रमाचे संचालन – कैलाश वैद्य यांनी केले व आभार प्रर्दशन- चंदुजी राऊत यांनी केले.कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष संजयजी बोहरे,साखरे सर,व इतर पदाधिका-यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपुर मेहनत घेतली व कार्यक्रम यशस्वी केले.




