गडचिरोली:- (हरीहर पाथोडे )दिनांक २ जुलै २०२३ रोज रविवारला दुपारी ३.०० वा. महाराजा सेलिब्रेशन हॉल धानोरा रोड, गडचिरोली येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या भव्य जाहीर सभेला जनतेनी विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन खासदार अशोक नेते यांनी पत्रकार परिषदेत केले.
याकरिता आज दि.२९ जून २०२३ रोज गुरुवारला भारतीय जनता पार्टी जिल्हा गडचिरोली च्या वतीने पत्रकार भवनात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी प्रामुख्याने मा.अशोक नेते,खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा.आमदार डॉ.देवराव होळी,जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे,जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे,जिल्हा महामंत्री प्रशांत वाघरे,भाजपा जेष्ठ नेते रमेश भुरसे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारत खटी,भाजपा जिल्हा सचिव तथा जेष्ठ नेते सुधाकर येनगंदलवार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, स्वप्निल वरघंटे,ओबिसी सेलचे आनंदराव पिरूरकर, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री केशव निंबोड,शहर महामंत्री विनोद देओजवार,शहर उपाध्यक्ष श्रीकांत पतरंगे,शहर उपाध्यक्ष सोमेश्वर धकाते,तसेच पत्रकार बंधू उपस्थित होते.
