Search
Close this search box.

Published:

अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले.

रस्ता सुरक्षा समितीची बैठक मा.खासदार अशोक नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे सभा संपन्न झाली.
गोंदिया:- (हरिहर पाथोडे )  दि.०३ जुलै २०२३जिल्हातील रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्री. अशोकजी नेते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पार पडली. सर्व प्रथम रस्ता सुरक्षा समितीची बैठक सुरू होण्या अगोदर खासदार सुनिल जी मेंढे साहेब व जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे तसेच बैठकीत उपस्थिती सहभागी यांनी मा.खासदार अशोकजी नेते यांना वाढदिवसाच्या निमित्याने उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देत बैठक सुरू करण्यात आली.या बैठकीत खासदार अशोकजी नेते यांनी अध्यक्षतेखाली बोलतांना रस्ता सुरक्षेसंबधित काम करणारे महत्वाची भुमिका (आरटीओ) परिवहन अधिकारी व पोलीस विभाग हे दोन विभाग यामध्ये अतिशय महत्त्वाचे काम करतात.रस्ता सुरक्षेत विविध कारणांमुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. मानवाचा जीव अत्यंत मोलाचा असून रस्त्यांवर होणारे अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याकरिता सर्व संबंधित विभाग रस्ते सुरक्षा संबंधित घटकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे निर्देश खासदार अशोकजी नेते यांनी दिले.तसेच याप्रसंगी रस्ते अपघाताचा आढावा,रस्त्यांवर दिशादर्शक/माहितीदर्शक फलक लावणे, गतिरोधक( स्पिडब्रेकर),रस्त्यांच्या कडेला वाढलेली झुडपे, रस्त्यांवरील अतिक्रमणे,रस्ता सुरक्षा जनजागृती, अशा विविध विषयांवर चर्चा करू काय उपाययोजना केल्या जाईल यावर सविस्तर चर्चा झाली.यामध्ये अपघात होण्यामध्ये ओव्हर स्पीडमध्ये गाडी चालविणे,ट्रिबल सीट, हेल्मेट न वापरणे, रॉंग साईड गाडी चालविणे, (मद्यपी) दारु पिऊन गाडी चालविणे,गाडी चालवतांना मोबाईल वापर करणे,रस्त्यांवर जनावरे असणे,लहान मुले गाडी चालविणे त्यांचा नियत्रंण नसणे, अशा विविध माध्यमातून अपघात होतात यावर उपाययोजना करून कार्यवाही करण्यात यावी.असे ही निर्देश यावेळी दिले.याप्रसंगी प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा चे अशोकजी नेते, खासदार सुनिल जी मेंढे, जि.प‌.अध्यक्ष पंकज रहांगडाले,जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे,पोलीस अधिक्षक निखिल पिंपळे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील,जिल्हा परिवहन अधिकारी राजेश करपे,आमदार विनोद अग्रवाल, जि.प.उपाध्यक्ष यशवंत गणविर,भाजपाचे जेष्ठ नेते झामसिंग जी येरणे,गजेंद्र फुंडे,परसराम फुंडे,आदित्य शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करा.असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी परिवहन अधिकाऱ्यांना दिले., ID: 28594

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर