गोंदिया ः- गोंदिया पोलिस स्टेशन ची थोडक्यात माहिती अशी की, घटना दिनांक २७/०६/२०२३ चे १७.०० वा. दरम्यान गणेशनगर गोंदिया येथील मुदलियार कोचिंग क्लासेस, समोरून सायकल चोरी ची घटना घडली होती.तसेच घटना दिनांक ०४/०७/२०२३ चे १५.३० वा. दरम्यान नागपुरे मेडिकल बाजूच्या गल्ली तील टायपिंग सेंटर समोर ठेवलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटर सायकल क्रं. एम. एच. ३५ एक्स १९७५ चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने त्याचप्रमाणे तिसरी घटना तारीख १/०७/२०२३ ते २/०७/२०२३ चे रात्र दरम्यान पिंडकेपार शिवार रेल्वे लाईन पुलाचे बांधकामकरीता आणलेले लोखंडी सेंट्रिंग प्लेट चोरी झाल्याने तक्रारदार यांचे तक्रारी वरून पो. ठाणे गोंदिया शहर येथे अनुक्रमे
१) अप क्रं.४३४ /२०२३ .
२) अप क्रं.४३९ /२०२३
३) अप क्रं.४३१ /२०२३ कलम ३७९ भादंवि अन्वये चोरीचे वेगवेगळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मा. श्री निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री.अशोक बनकर, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी, श्री.सुनील ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांनी नमुद तीन्ही गुन्ह्यांचे तपासाच्या अनुषंगाने ठाणेदार गोंदिया शहर श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांना तपास सुचना देवुन गुन्ह्यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेऊन तात्काळ गुन्हे उघड करण्याच्या सूचना दिल्या होत्या.त्याप्रमाणे पोलीस ठाणे गोंदिया शहरचे पो. नि. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांनी मा. वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना सूचना केल्या त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी अंमलदारानी गोपनिय माहितीच्या आधारे – तिन्ही गुन्ह्यातील चोरी करणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आणि गुन्हेगार नामे – १) दिनेश रेखलाल चौधरी, राहणार आंभोरा यास १) अप क्रं.४३४ /२०२३ चोरीच्या गुन्ह्यात सायकलसह राजभोज चौक येथून तसेच २) शैलेश बुधारू सोनवाणे, वय २२ वर्षे राहणार भरवेली जिल्हा बालाघाट (म. प्र.) यास २) अप क्रं.४३९/२०२३ मध्ये चोरीच्या मोटर सायकलसह मौजा कटांगी-नागरा येथूनत्याचप्रमाणे आरोपी नामे-
३) अभिषेक विनोद चंदेल वय २२ वर्षे ४) प्रवीण विनोद भुते, वय २४ वर्षे, दोन्ही रा. श्रीनगर, गोंदिया यांना चोरीचा गुन्हा ३) अप क्रं.४३१/२०२३ मध्ये ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या गुन्हेगारांना पो. स्टे. ला आणुन नमुद चोरीच्या गून्ह्या संबंधात विचारपूस करून तपास केला असता ताब्यात घेतलेल्या गुन्हेगार अरोपीतांनी चोरी केल्याची कबुली देवून गुन्हे केल्याचे सांगितले. नमूद आरोपी यांचे ताब्यातून-
१)अप.क्र.४३४/२०२३* मधील चोरी केलेली सायकल, किंमती अंदा .५,०००/- रूपये* .२)अप.क्र.४३९/२०२३ मधील चोरी केलेली हीरो कंपनीची स्प्लेंडर मो.सा. किंमती ४०,०००/- रूपये .तसेच ३)अप.क्र.४३१/२०२३ मधील चोरी केलेली लोखंडी सेंट्रीग प्लेट ४ नग किंमती ३०,०००/- रूपये हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.नमूद तिन्ही गुन्हयाचा अधिकचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकातील गुन्ह्याचे तपासी अंमलदार पोहवा. प्रमोद चव्हाण, दीपक रहांगडाले, कवलपाल सिंग भाटिया,पो. स्टे. गोंदिया शहर हे करीत आहेत.सदरची कामगिरी मा. श्री.निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोदिया, श्री. अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोदिंया, श्री. सुनिल ताजने, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग गोंदिया यांचे मार्गदर्शना खाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील स. पो. नि. सागर पाटील, पो. हवा. कवलपाल भाटीया, जागेश्वर उईके, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, मपोहवा. रिना चौव्हाण, पो.शि. दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाने, कुणाल बारेवार यांनी केलेली आहे.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: चोरी करणाऱ्या ४ गुन्हेगारांना अटक, चोरीचे तीन गुन्हे उघड, चोरीच्या गुन्ह्यातील किंमती ७५ हजाराचा मुद्देमाल सायकल, मोटर सायकल, लोखंडी प्लेट हस्तगत, गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी, ID: 28621
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: चोरी करणाऱ्या ४ गुन्हेगारांना अटक, चोरीचे तीन गुन्हे उघड, चोरीच्या गुन्ह्यातील किंमती ७५ हजाराचा मुद्देमाल सायकल, मोटर सायकल, लोखंडी प्लेट हस्तगत, गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी, ID: 28621
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]