गोंदिया ः- याबाबत थोडक्यात माहिती अशी की, सन 2016 मध्ये झालेल्या DGsP / IGsP कॉन्फरन्समध्ये, निकोप स्पर्धा वाढावी, तसेच कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, दोषसिध्दी यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी देशपातळीवर 10 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची (Best Police Station) म्हणून निवड करण्याबाबतचा निर्णय केंद्रीय स्तरावर घेण्यात आला असून त्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांची निवड भारत सरकार, गृह मंत्रालया कडून करण्यात येते.सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा विचार करून देशपातळीवर सर्वोत्कृष्ट पोलीस ठाण्यांच्या निवड प्रक्रियेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस ठाण्यांचा समावेश होण्याच्या दृष्टीने, तसेच राज्यातील पोलीस ठाण्यांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे, गुणवत्ता वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध आणि गुन्हयाचा तपास, आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंधित पोलीस अधिकारी / अंमलदार यांना प्रोत्साहित करणे, इत्यादी हेतू साध्य करण्यासाठी सन 2020 या वर्षापासून राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची निवड करुन सदर पोलीस ठाण्यांना सन्मानचिन्ह व रोख बक्षिस प्रदान करण्यात येत आहेत. त्याच धर्तीवर सन- 2021 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत राज्य पातळीवर सर्वोत्कृष्ट पोलिस ठाणे स्पर्धेकरीता निश्चित करून दिलेले गुणांकन, निकष व नियमावली इ. बाबी बारकाईने विचारात घेवून घटकातील सर्व पोलीस ठाण्यांचे मूल्यमापन करून त्यापैकी 2 उत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती, तसेच परिक्षेत्रीय विशेष पोलीस महानिरीक्षक / पोलीस आयुक्त यांनी घटक निहाय / परिमंडळ निहाय प्राप्त प्रत्येकी 2 पोलीस ठाण्यांमधून परिक्षेत्र / आयुक्तालय स्तरावर उत्कृष्ट 2 पोलीस ठाण्यांची निवड करण्यासाठी परिक्षेत्रीय स्तरावर समिती, आणि परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्तः उत्कृष्ट पोलीस ठाण्यांमधून 5 सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे निवडण्यासाठी राज्य स्तरावर समिती इ. समित्या गठीत करण्यात आल्या होत्या.या अनुषंगाने सन 2021 या वर्षातील कार्यमुल्यांकनाच्या बाबतीत परिक्षेत्र निहाय व आयुक्तालय निहाय प्राप्त उत्कृष्ट पोलीस ठाण्यां मधून सर्वोत्कृष्ट 5 पोलीस ठाण्यांची शिफारस राज्य स्तरावरील समितीने केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील 5 पोलीस स्टेशन ची निवड करण्यात आली असून त्यात प्रामुख्याने –
1) शिवाजीनगर पोलीस ठाणे (कोल्हापूर)2) देगलुर पोलीस ठाणे (नांदेड)3) वाळुंज पोलीस ठाणे (छत्रपती संभाजी नगर शहर)4) अर्जुनी मोर पोलीस ठाणे (गोंदिया)5) राबोडी पोलीस ठाणे (ठाणे शहर)अश्या 5 पोलीस ठाण्यांना सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून राज्य स्तरावरील समितीने घोषीत केले आहेसर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून घोषीत करण्यात आलेल्या 5 पोलीस ठाणे पैकी गोंदिया जिल्हयातील पोलीस ठाणे अर्जुनी मोर पो ठाणे नी गोंदिया जिल्हा दलाचा संपूर्ण देशात व राज्यात नावलौकिक वाढवीला आहे. संपूर्ण गोंदिया जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी पोलीस ठाणे अर्जूनी मोरगाव येथील अधिकारी- अंमलदार यांचे कार्याचे कौतुक केले आहे. खास शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम आज दिनांक- 6/7/2023 रोजी पोलीस ठाणे अर्जुनी मोर येथे आयोजित करण्यात आलेला होता.
Ad debug output
The ad is displayed on the page
current post: गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें अर्जुनी/मोरगाव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- 2021 घोषित (Best Police Station-2021), ID: 28625
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
The ad is displayed on the page
current post: गोंदिया जिल्ह्यातील पोलीस ठाणें अर्जुनी/मोरगाव सर्वोत्कृष्ट पोलीस ठाणे- 2021 घोषित (Best Police Station-2021), ID: 28625
Ad: MM LIGHTTING (2543)
Find solutions in the manual
आपले राशी भविष्य
नवराष्ट्र कौल
[democracy id="2"]