Published:

हलबिटोला वासियांनी केली गटशिक्षणाधिकारी कडे मागणी लागणार शाळेला कुलूप ; शाळा झाली शिक्षका विना हलबिटोला वासियांनी केली गटशिक्षणाधिकारी कडे मागणी लागणार शाळेला कुलूप ; शाळा झाली शिक्षका विना

सालेकसा ः- (बाजीराव तरोणे) सालेकसा तालुक्यातील जूनी असलेली वरिष्ठ मराठी शाळा हलबिटोला सालेकसा या शाळेने अनेकांचे जीवन बदलविले मात्र या शाळेला कुलुप लागण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. या शाळेत इयत्ता सातवी पर्यंत वर्ग असून 100 च्या जवळ विद्यार्थी संख्या आहे. सध्या तरी एकही स्थायी शिक्षक नाही. या शाळेच्या दयनीय अवस्थेला बघून शाळा व्यवस्थापन समिती व नागरिकांच्या वतीने गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती सालेकसा यांना निवेदनाच्या माध्यमातून मागणी करण्यात आली. या मागणीनुसार जर दोन दिवसाच्या आत स्थाई शिक्षकांची व्यवस्था झाली नाही तर नागरिक,पालक व विद्यार्थ्यांसह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उपोषणाचा मार्ग निवडल्याचेही यावेळी बोलण्यात आले.गटशिक्षणाधिकारी, सह तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपावली परतेती, अध्यक्ष बबलू मानकर, प्रल्हाद वाढई,सुधिर भांडारकर, बाजीराव तरोने,अनिल चौधरी, बानू किरसान, अंजय घरडे, शंकर राउत,धर्मानंद राउत, माणिक राउत,विश्वनाथ भोयर, इंद्रकला बावनथडे, रविता वलथरे, लक्ष्मीबाई तरोने,रत्नमाला किरसान, भुमेश्वरी भोयर, ज्योती जंगेरे, कला गावराने, सविता घरडे, माहेश्वरी भोयर यांच्या सह अनेक पालक व नागरिकांची उपस्थिती होती.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: हलबिटोला वासियांनी केली गटशिक्षणाधिकारी कडे मागणी लागणार शाळेला कुलूप ; शाळा झाली शिक्षका विना हलबिटोला वासियांनी केली गटशिक्षणाधिकारी कडे मागणी लागणार शाळेला कुलूप ; शाळा झाली शिक्षका विना, ID: 28645

Ad: MM LIGHTTING (2543)





Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर