सालेकसाः- (बाजीराव तरोणे) तिरखेडी-साकरीटोला हा रस्ता सालेकसा, सालेकसा तहसील मुख्यालय व जिल्हा मुख्यालय आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 यांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे.या मार्गाचा शेकडो वाहनचालक दररोज वापर करतात.गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याचे पुर्णपणे खड्डेमय रुपांतर झाले असून त्यामुळे अनेक वाहनचालकांचे हाल झाले आहेत. गेल्या दोन वर्षात अपघात झाले असून वाहनचालकांना सतत समस्यांना सामोरे जावे लागत आहे.निकृष्ट बांधकामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, ग्रामपंचायत स्तरावर त्याचा निषेध करण्यात आला होता, पण कसाबसा हा रस्ता तयार करण्यात आला, मात्र 5 वर्षातच खड्डे पडू लागले. रस्ता झाला, पण त्याच्या सुधारणेची दखल ना कंत्राटदाराने घेतली ना संबंधित विभागाने, परिणामी असा प्रकार घडला की, आता संपूर्ण रस्ता खड्ड्यांमध्ये बदलला आहे, असे स्थानिक आमदार सहसराम कोरोटे यांनी सांगितले यांच्यासह जि.प.चे सदस्य विमल कटरे, जि.प.वंदना काळे, पं.स.सदस्या रेखा फुडे यांनी निवेदन दिले, मात्र त्यावरही संबंधित विभाग जागे झाला नाही.झोपेतून जागे होण्यासाठी आमदार सहसराम कोरोटे, जि.प.सदस्या विमल कटरे, जि.प.सदस्या वंदना काळे, जि.प.सदस्या छाया नागपुरे, प स. सदस्या रेखा फुडे यांच्या नेतृत्वाखाली भजन दिंडी रास्ता रोको केला, यामध्ये जि.प.सदस्यांनी स्वत: हातात घेमाळ फावडे घेवून रस्त्यावरील खड्डे व संबंधित विभागाला वृक्षारोपण करून झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर अधिकारी वर्ग संबंधित विभागाने रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवले जातील, असे आश्वासन दिले, मात्र आता पर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही, आता सातगाव-तिरखेडी रस्त्यावरील खड्डे कधी भरणार ते सांगा.
